शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठवा-गाव वाचवा अभियानापासून जिल्हा दूरच

By admin | Updated: August 18, 2014 23:18 IST

पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून

भंडारा : पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून गौरवही केला जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा थेंबनथेंब अडविण्याचे शासनाचे धोरण आहे. या अभियानाला चालना देण्यासाठी पाणी साठवा - गाव वाचवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवायचे आहे. मात्र हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून पाणी टंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोल साधता येतो, या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने पाणी साठवा - गाव वाचवा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. भूजल पातळी सर्व्हेक्षण, परीक्षण महिन्यात करावे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, पाणी साठविण्यासाठी कामाचे नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करणे, वॉटर अकाऊंट तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी तज्जांची मदत घेणे, शासकीय, निमशासकीय, खासगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमुख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरूस्त तलाव विहिरी शेततळ्यांमधील गाळ काढून तसेच आवश्यक ती दुरूस्ती करून जलसंचय करणे, भुगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचयतीने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. गावपातळीवर कामे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, खडकांचे पाणी, पाझर व पाणी साठविण्याची क्षमता आणि इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नियोजन करणे, गावातील पाण्याची पातळी मोजणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित करून पाणी टंचाईसाठी झालेला खर्च पाहणे, पाणी टंचाई, दुष्काळामुळे कृषी उत्पादन, पशू व्यवसायात झालेली घट लक्षात घेणे, पाणी टंचाईने मानवी जीवनावर झालेला परिणाम, रोगराई, बालमृत्यूचे प्रमाण, कुपोषणाची माहिती यासह ग्रामपंचायत परिसरातील भुगर्भाचा अभ्यास करून पाणी साठविण्याचा आराखडा तयार करावयाचा आहे. (शहर प्रतिनिधी)