शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षात उमेदवारीसाठी धावपळ

By admin | Updated: June 8, 2015 01:06 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील याचे अंदाज बांधले जात होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नवखे चेहरे मैदानात उतरणारमोहाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील याचे अंदाज बांधले जात होते. अखेर निवडणुकीचा बिगूल वाजला. आता उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच निवडणुकीत उतरू पाहणारे कार्यकर्ते नेत्यांच्या मनधरणीला लागले आहेत. आरक्षणामुळे फटका बसलेल्या नेत्यांना कुठून लढावे हा प्रश्न पडला आहे. आता मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सात विभाग पाडले गेले आहे. यात कांंद्री, डोंगरगाव, आंधळगाव, खमारी बुज, वरठी, बेटाळा व करडी या गटाचा समावेश आहे. कांद्री जिल्हा परिषद सोडला तर सर्वच गटामध्ये आरक्षणामुळे विद्यमान सदस्याची गोची झाली आहे. स्वभाविकच डोंगरगाव, आंधळगाव, खमारी बुज, वरठी, बेटाळा, करडी या क्षेत्रासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार नवीन राहणार आहेत. तसेच पंचायत समितीचे कांद्री, जांब, उसर्रा, डोंगरगाव, आंधळगाव, हरदोली, खमारी बुज, पाचगाव, वरठी, मोहगावदेवी, बेटाळा, पालोरा, देव्हाडा र्खुद व करडी असे चौदा क्षेत्र आहेत. इथेही आरक्षणामुळे अनेकांना प्रतिबंध बसला आहे. यावेळी मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात नवीन चेहरे येण्याची शक्यता आहे. केंद्र, राज्य तसेच भंडारा जिल्हा परिषद, मोहाडी पंचायत समितीत भाजपचाच बोलबाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य बनण्यासाठी अनेक कार्यकर्ते उत्सूक आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी आपसात संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. 'अच्छे दिन'च्या नावाखाली आपली पूंजी वाजू शकते ही भावना भाजपच्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. पण, सध्या 'अच्छे दिन'ची हवा ओसरल्याचे चित्र आहे. पण, जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार व खासदार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे. आज सद्यातरी या जोमात उमेदवारी घेण्यासाठी भाजपमध्ये रिघ लागल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा वजन आहे. तगडे आवाहन देणारे कार्यकर्ते आहेत. या वेळेस निवडणुका तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यामध्येच दिसून येतील. काँग्रेस पक्षाचा नाव असला तरी लढा वृत्ती असणारे तालुक्यात नेतृत्व नाही. यामुळे मोहाडी तालुक्यात काँग्रेस कमजोर पडली आहे.राष्ट्रवादी पक्षात तिकीटांसाठी इच्छूक असणारे बरेच आहेत. येथेही जेष्ठांना उमेदवारी देताना चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. १३ जूनपर्यंत सर्वच पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले अर्ज भरले आहेत. आठवड्याभरात उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्ष मुलाखती घेतील, असा कयास आहे. यावेळी शिवसेना चांगल्या ताकतीने लढणार आहे. कारण शिवसेना राज्यात युतीच्या सत्तेत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण ताकत शिवसेना झोकून देणार आहे. अगदी तोंडावर निवडणुका आल्याने भाजपा- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँगे्रेस या एकात राहून लढतील याची शक्यता आता कमी झाली आहे. स्थानिक पातळीवर तत्परतेने युती, आघाडी झाली तर निवडणुकीचे येणारे निकाल वेगळे बघायला मिळतील. पण, सोबत लढण्याची भाषा युती व आघाडीमधील कोणतेच नेते व कार्यकर्तेही करतानी दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस, शिवसेना हे चार पक्ष आपली शक्ती वेगवेगळी अजमावतील. मोहाडी तालुक्यात भाजपाला आपली प्रतिष्ठा कायम ठेवायचे आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन पक्षाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. आज स्थितीत कोणत्या पक्षाची हवा आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच सगळे अंदाज बांधले जाणार आहेत. पक्षाच्या नावावर व स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर तसेच निवडणुकीत कोण किती अर्थ ओततो, यावरही सगळं काही संभव आहे. साधारणत: १५ जूननंतर लढती कशा होतील, कोणाची बाजू भक्कम राहील याचे नक्की अंदाज बांधले जावू शकतील. सध्या निवडणुकीच्या चर्चेला उधाण आहे. (तालुका प्रतिनिधी)