शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटीकरिता २४ कोटींचा निधी थकीत

By admin | Updated: September 10, 2014 23:25 IST

बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या

बावनथडीसाठी मुंबईत बैठक : एआयबीपी समावेशामुळे केंद्राची निधी मिळणे गरजेचेतुमसर : बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी अंतर्गत येत असल्याने केंद्र शासन येथे २५ टक्के निधी देते.सन २०१३ मध्ये देशात व राज्यात गारपीट व इतर नैसर्गीक आपत्तीमुळे या प्रकल्पाला २५ टक्के निधी मिळाला नव्हता त्यामुळे मागील वर्षी राज्य शासनाचाही निधी प्राप्त झाला नाही. जलसंपदा विभागाच्या सचिवांनी विदर्भ पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी दि.९ रोजी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या कामाची सविस्तर माहिती, त्रृट्या, रखडलेली कामे, पुनर्वसन पॅकेज यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षी पुन्हा केंद्र सरकारकडे २५ टक्के रकमेची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाला येथे २५ टक्के रक्कम म्हणजे सहा कोटी देणे आहे. त्यानंतर राज्य सरकार २४ कोटींचा निधी मंजूर करेल, अशी माहिती आहे. बावनथडी प्रकल्प केंद्राच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट असल्याने प्रथम केंद्र शासनाला २५ टक्के निधी द्यावा लागतो. प्रकल्प पूर्णत्वास ७० ते ८० कोटी निधीची गरज असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास एक ते दीड वर्षे पुन्हा लागतील. मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ सचिव व अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम उपस्थित होते. गेडाम यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. (तालुका प्रतिनिधी)