शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

‘वखार’च्या रोटेशन पद्धतीला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

तुमसर येथे बाजार समितीजवळ वखार महामंडळाचे गोदाम आहे. तुमसर तालुक्यात धान भरडाई करून तांदूळ तयार करण्यात येते. सदर तांदूळ मिलर वखार महामंडळाला देतात. तुमसर व मोहाडी तालुक्यात धान भरडाई करणाऱ्या मील आहेत. वखार महामंडळ गोदामात तांदूळ मोजमाप करण्याचे नियम ठरवून दिले आहेत. रोटेशन पद्धतीने येथे तांदळाचा वजनकाटा करण्यात येतो.

ठळक मुद्देमिलर असोसिएशन सदस्यांमध्ये रोष : माजी आमदारांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वखार महामंडळात रोटेशन पद्धतीने मिलरचे तांदळाचे ट्रक वजन काटा भरण्याचा नियम आहे. परंतु काही दिवसापासून येथे मर्जीतील एका मिलरचे ट्रकच वजनकाटा करणे सुरु आहे. यावर मिलर असोसिएशनने आक्षेप घेतला. याप्रकरणी माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडे तक्रार केली. वाघमारे यांनी वखार महामंडळात भेट देऊन नियमानुसार कार्य करण्याचे निर्देश दिले.तुमसर येथे बाजार समितीजवळ वखार महामंडळाचे गोदाम आहे. तुमसर तालुक्यात धान भरडाई करून तांदूळ तयार करण्यात येते. सदर तांदूळ मिलर वखार महामंडळाला देतात. तुमसर व मोहाडी तालुक्यात धान भरडाई करणाऱ्या मील आहेत. वखार महामंडळ गोदामात तांदूळ मोजमाप करण्याचे नियम ठरवून दिले आहेत. रोटेशन पद्धतीने येथे तांदळाचा वजनकाटा करण्यात येतो. तशा सूचना दर्शनी फलकावर लावण्यात आल्या आहेत.गत काही दिवसांपासून तांदळाचे वजनकाटा रोटेशन पद्धतीने न होता मर्जीतील मिलरच्या तांदळाचा वजनकाटा येथे करणे सुरु आहे. यावर मिलर असोसिएशन सदस्यांनी आक्षेप घेतला. याबाबत माजी आमदार चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केली. त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत तुमसर येथील वखार महामंडळ गोदामाला भेट दिली.तहसीलदार गजेंद्र बालपांडे, वखार महामंडळाचे अधिकारी पिकलमुंडे यांना याबाबत विचारणा केली. रोटेशन पद्धतीने तांदूळ मोजमाप न करता मर्जीतील मिलरचे तांदळाचे मोजमाप करताना इतर मिलर्स सदस्यांवर अन्याय होत असून ते तात्काळ बंद करून नियमानुसार मोजमाप करण्याचे निर्देश माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिले. याप्रसंगी मिलर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.