शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता उठला नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे.

ठळक मुद्देखांबतलाव परिसर : सहा महिन्यांपासून अर्धा किमी रस्त्याचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्ता चौपदरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात असताना भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. वळणावर अपघाताची भीतीही निर्माण झाली असून हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. शहरातील सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना हाच रस्ता का अपूर्ण असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र रस्ता निर्माणाधिन असल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे खड्डे बुजविले जात नाही. एका आरो सेंटरचे पाणी सोडले जाते. ते पाणी रहदारीच्या रस्त्यावरील खड्ड्यात शिरते. घाणेरडे पाणी वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडते. महिला, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.खामतलाव परिसरात बहिरंगेश्वर मंदिराजवळ रहदारीच्या रस्त्यावर भाज्यांची दुकाने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.अहोरात्र चालणाऱ्या या रस्त्यावर अपघाताची भीती नाकारता येत नाही. मोठे वळण असल्याने खात रोड कडून येणारे वाहन दिसत नाही. वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्य बजावत असले तरी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येते. या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी अ‍ॅड. एम. एस. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.अपघाताची मालीकातुरुंगापासून रेल्वे फाटकापर्यंत साधारणत: अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. नेमके कोणत्या कारणाने काम थांबले आहे हे कळायला मार्ग नाही. या रस्त्यावर आंतरराज्यीज वाहतूक सुरु असते. मोठाले ट्रक आणि कंटेनर अहोरात्र धावत असतात. त्यातच शहरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. परिणामी अपघाताची भीती कायम असते. दररोज लहान सहान अपघात येथे घडत आहे. आठ दिवसापूर्वी धानाच्या पोत्याने भरलेले एक ट्रॅक्टर अचानक उलटले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा