शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.

मुकेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या दिघोरी मोठीची लोकसंख्या ही सात हजारांच्या वर आहे. तसेच राजकीय दृष्ट्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून तालुक्यात दिघोरीची ओळख आहे. असे असताना गत आठवडाभरापासून दिघोरीतील जनतेला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी, अशी म्हणण्याची वेळ दिघोरीवासीयांवर आली आहे.    आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण  पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.नदी तीरावरील पाण्याचे जॅकवेल कोसळण्याच्या स्थितीत नव्हतीच. ‘व्हायब्रेटर मशीन’चा वापर केला आणि कंपनाने जॅकवेल कोसळली, असा आरोप वारंवार होत असताना सुद्धा आजपावेतो पाणीपुरवठा विभागातील एकही बड्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वी असलेल्या पाण्याच्या टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर उभारण्यात आल्या होत्या. मात्र, आताची लोकसंख्या वाढली असल्याने मोठ्या जलकुंभाची गरज आहे. पाणी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो.

तिसऱ्या दिवशी झाले टँकर गायब- निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हेच अधिकारी व पदाधिकारी यांनी गावात दोन दिवस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, तिसऱ्या दिवसापासून टँकर कुठे गायब झाले याचा अजून थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस फक्त काय श्रेय लाटण्यासाठी टँकर सुरू केले काय? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाण्याची टँकर का आले नाही, याबाबत विचारले असता, मी लग्नकार्यात आहे, आता काही मी सांगू शकत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. नदीपात्रात बंधारा बांधा- गावाची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. हाकेच्या अंतरावर नदी असताना आजपर्यंत पाणी अडविण्यासाठी बंधारा का बांधण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. पाणीटंचाईवर कायमची मात करता यावी, चूलबंद नदीवर बंधारा तयार करून ही समस्या कायमची निकाली काढता येऊ शकते.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात