शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत वाहतुकीसाठी रिंगरोडची गरज

By admin | Updated: July 3, 2014 23:23 IST

अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व

अपघात वाढले : किसान गर्जनाचे राजेंद्र पटले यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदनभंडारा : अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू असा विश्वास किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी व्यक्त केला. नवीन रिंगरोडसाठी संबंधित विभागाच्या अभियंत्याकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पटले यांनी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केलेअ ाहे. केंद्रीय मंत्र्यांनी निवेदनाची दखल घेतली असून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.दाटीवाटीच्या तुमसर शहरातीलरस्ते अरुंद असून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. जुने बसस्थानक ते बावनकर चौक व पुढे इतर मार्गावरून दुचाकीवाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदावर कार्यरत असताना राजेंद्र पटले यांनी स्वत: तयार केलेला रिंगरोडचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांना सादर केला होता. या कामाला त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने प्रस्तावित रिंगरोड लालफीतशाहीत अडकून पडला. गेल्या ८ वर्षापासून पटले रिंगरोडसाठी प्रयत्नरत असून साबांविकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले असून त्यावर कारवाई सुरु आहे. परिणामी, शहरात रिंगरोड होईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी अखेरपर्यंत लढा देऊ, असे राजेंद्र पटले यांनी सांगितले.साबांविचे उपविभागीय कार्यालय तुमसर शहरातून हलविण्यात आल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कार्यालय परत आणण्यासाठी साबांविचे सचिव मुखर्जी यांना निवेदन देण्यात आले आहे. कार्यालयाचे स्थानांतरण आणि रिंगरोडची निर्मिती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून प्रसंगी तीव्र आंदोलन उभारे जाईल असा इशारा पटले यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)