शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे चुकारे जुन्याच दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे.

ठळक मुद्दे२०५ कोटींची खरेदी : वाढीव दराने चुकाऱ्याचे आदेशच आले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला २५०० रुपये क्विंटल भाव जाहीर करून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही वाढीव दराने धानाचे चुकारे देण्याचे आदेशच प्रशासनाला प्राप्त झाले नाही. परिणामी जिल्ह्यात जुन्याच दराने धानाचे चुकारे होत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरत आहे. अडीच महिन्यात जिल्ह्यात ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जुन्या दराप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी रुपये आहे.
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाला १८१५ रुपये प्रतीक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरु होती. धानाला वाढीव भाव मिळावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी धानाला प्रतीक्विंटल ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची २५०० रुपये प्रतीक्विंटल भावाची मागणी कायम होती. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाच्याभावात २०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाला आता हमीभाव बोनस आणि वाढीव असा २५०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला होता. मोठ्या प्रमाणात धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर घेऊन पोहचले. त्या ठिकाणी अनंत अडचणींचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला.
जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ११ लाख ३२ हजार ४७२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जुन्या भावाप्रमाणे त्याची किंमत २०५ कोटी ५४ लाख ३७ हजार ६१ रुपये आहे. त्यापैकी १५५ कोटी ७१ लाख ६३ हजार २८० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराने आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी आशा होती. परंतु शासनाने जुन्याच म्हणजे १८१५ रुपये या हमीभावानेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. बोनस आणि वाढीव दराचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.
वाढीव दराची घोषणा होऊन आता तीन आठवडे उलटले आहेत. परंतु अद्यापही वाढीव दराने चुकारे करण्याबाबतचे आदेश धान खरेदी केंद्रावर पोहचले नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात जुन्याच दराने पैसे टाकले जात आहेत. शासनाने घोषित केलेल्या वाढीव दराने पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र आदेश नसल्याने याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.

५० कोटींचे चुकारे प्रलंबित
१ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे प्राप्त झाले नाहीत. ४९ कोटी ८२ लाख ७३ हजार ७८० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असून तात्काळ पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु अनेक शेतकरी अद्यापही चुकाऱ्यापासून वंचित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार