परतीचा पाऊस, तुडतुड्याने धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:33+5:30

करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात आलेल्या दोन वेळच्या महापुरामुळे तूर व तिळाचे पीक नेस्तनाबुत झाले.

Returning rain, crumbling paddy in crisis | परतीचा पाऊस, तुडतुड्याने धान संकटात

परतीचा पाऊस, तुडतुड्याने धान संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हतबल : कळपा पालटणे व पाणी काढण्यासाठी अतिरिक्त खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. सततचे ऊन पाऊस व सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला जात आहे. परतीच्या मुसळधार पावसाने हलक्या धानाच्या कळपा पाण्यात सडल्या. धानाच्या लोंबा कुजल्या. लोंबी कुजल्या. लोंबीवरील धान वादळांमुळे जमिनीवर लोटून जमिनदोस्त झाले. पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेताची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. धान कापणी व भीजलेल्या कळपा पालटविण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो आहे.
करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात आलेल्या दोन वेळच्या महापुरामुळे तूर व तिळाचे पीक नेस्तनाबुत झाले.
गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने झोडपणे सुरू केले आहे. हलके धान कापणी व मळणीवर तर भारी धान परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. लोंबीवर आलेले धान जमिनदोस्त लोळले असून त्यावर पाणी साचले आहे. शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांना अर्धा किमीपर्यंत रस्त्याच्या कडेने नाल्या काढाव्या लागत आहेत. अनेकांनी डिझेल इंजीनचा वापरही सुरू केला आहे. कापणी केलेल्या कळपा पाण्यात सडल्या असून सडका वास शेतिशवारात पसरला आहे. त्यातच रोगांनी धानाचे नुकसान केले आहे.

Web Title: Returning rain, crumbling paddy in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.