शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

निकालासह शाळांची प्रवेश प्रक्रियाही रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

मोहाडी - कोरोना संकटाने पहिली ते आठवी विद्यार्थी घरीच बसून पास होणार आहेत. तर नववीच्या विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा ...

मोहाडी - कोरोना संकटाने पहिली ते आठवी विद्यार्थी घरीच बसून पास होणार आहेत. तर नववीच्या विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा आपल्या पातळीवर मूल्यमापन करणार आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांचे निकाल अद्यापही तयार झाले नाहीत. त्यामुळे निकालाचे प्रगतिपुस्तक लॉकडाऊननंतर व शाळा सुरू झाल्यावरच विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पहिली ते आठवी विद्यार्थी तसेच नववीतील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती मिळणार आहे. मात्र, कोरोनाच्या प्रभावाने शिक्षकांना निकाल तयार करणे, विद्यार्थ्यांना निकालाची प्रत देणे ही प्रक्रिया करायला उशीर लागणार आहे. शाळा बंदमुळे पहिली, पाचवी, आठवी, नववी आदी वर्गाची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिक्षकांना प्रभावित केले. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली. तरीही धास्ती कायम आहे. शाळा सुरू करण्याचे कोणतेही शासन, प्रशासनाचे आदेश नाहीत.

गत वर्षापासून कोरोनामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा खोडा निर्माण झाला आहे. शाळांची संख्या जास्त, वर्गतुकड्यांची झालेली घट यामुळे दरवर्षी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे नोकरी अबाधित राहावी म्हणून पालकांच्या दारी शिक्षक जात आहेत. नवीन विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी शिक्षकांना एप्रिल, मे, जून या महिन्यांत उन्हाळा अंगावर काढावा लागत होता. कोरोनामुळे हा प्रवेश प्रक्रियेचा आटापिटा थांबला आहे. तरीही विद्यार्थ्यांच्या भरतीची चिंता अन्‌ कोरोनाच्या भीतीने शिक्षकांचा जीव घुसमळत आहे.

बॉक्स

दहावी-बारावीचे विद्यार्थी चिंतित

सर्वांत जास्त चिंता दहावी, बारावीत असणाऱ्या विद्यार्थी, पालकांना सतावत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचा विषय तळ्यात - मळ्यात चालत आहे. आता तर दहावीच्या परीक्षेचा विषय न्यायालयात गेला आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दहावीचे विद्यार्थी-पालक तसेच शिक्षकांना चिंतित राहावे लागणार आहे. किती अभ्यास करावा, असा प्रश्न आता विद्यार्थी पालकांना विचारत आहेत.