शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

धान्य बियाणांवर निर्बंध कुणाचे?

By admin | Updated: June 7, 2015 00:42 IST

खरीप हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच खासगी कंपन्यांनी बियाणीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने नेमके ..

लाखांदूर : खरीप हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच खासगी कंपन्यांनी बियाणीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने नेमके कोणत्या कंपनीची बियाणे विकत घ्यायची याबाबतीत शेतकरी संभ्रमात सापडला आहे. एकरी उत्पन्न जास्त मिळेल, या हेतूने यापूर्वी खासगी कंपनीच्या बियाणामुळे मोठी फसगत झाल्याने शेतकरी बाजारातील धान्य बियाणांवर निर्बंध कुणाचे म्हणून मन:स्थितीत आहे.खरीप हंगामाला सुरवात होत आहे. उन्हाळी धानपिकाची मळणी करून शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणांच्या जुळवा जुळव करण्याच्या लगबगीत असताना खेडोपाळी खाजगी कंपन्यांनी मोठ मोठ्या जाहीरातीचे फलक लावून शेतकऱ्यांना मोहात ओढण्याचा केविलवाना प्रकार सुरू केला आहे. बि-बियाणे शेतकऱ्यांसाठी तारक की मारक या संभ्रमात शेतकरी वर्ग दिसून येत असल्याने या बियाणे विक्रीवर कुणाचे निर्बंध नाही काय, असाही प्रतिप्रश्न विचारल्या जात आहे. लाखांदूर तालुक्यात २६ हजार ७११ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली असून ५ हजार ४०० क्विंटल बियाणांची गरज ३२ हजार शेतकऱ्यांना आहे. ७५ टक्के शेतकरी हे केंद्रातील बियाणांवर अवलंबून असून २५ टक्के शेतकरी हे स्वत:जवळील बियाणे पेरणीकरीता वापरतात. (तालुका प्रतिनिधी)बोगस बियाणावर आळा घालणारखरीप हंगामाला सुरवात होताच बियाणे, खते, औषधींच्या परवानाधारक कृषी केंद्राची तपासणी केली जाते. कंपनीची परिपूर्ण मान्यता व बियाणांच्या योग्यतेची तपासणी करूनच विक्रीला मान्यता दिली. यंदा सुद्धा कृषी विभाग पं.स. लाखांदूर विशेष भरारी पथक तयार करून बोगस बियाणे कंपनीवर आळा घालणार आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर यापूर्वी कार्यवाही झाली. परंतू, कायद्यात केवळ ५०० रूपये दंड असल्याने तसेच गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी नमुने प्रशीता शाळेत पाठविल्यानंतर अहवाल येईपर्यंत आॅल ईज वेल होत असल्याने अशा कंपन्या जाहिरातीच्या माध्यमातून फोफावल्या आहेत. त्यामुळे कायद्यात दुरूस्ती करून कड शिक्षा केल्यास बोगस बियाणे कंपनीवर आळा बसेल. - संजय लांजेवार, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कृषी विभाग, लाखांदूर