शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव येथे विहिरीत आढळला दुर्मिळ खवल्या मांजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जीभ वापरून तो आपले भक्ष्य पकडतो. नैसर्गिक अधिवास संपत असल्याने खवल्या मांजराचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेकदा त्याची शिकारही केली जाते.

ठळक मुद्देवनविभागाच्या सुपूर्द करून जंगलात सोडले, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगातील ग्रीन व्हॅली चांदपूर परिसरातील बोरगाव शिवारातील एका विहिरीत दुर्मिळ खवल्या मांजर शनिवारी सकाळी आढळून आला. या मांजराला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या मदतीने खवल्या मांजराला ताब्यात घेऊन त्याला जंगलात सोडण्यात आले. चांदपूर परिसरात पहिल्यांदाच खवल्या मांजराचे दर्शन नागरिकांना झाले.
ग्रीन व्हॅली चांदपूर परिसरातील घनदाट जंगलात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अनेक प्रजातींचे वन्य प्राणी या जंगलात आढळात आहेत. अनेक हिंस्त्र व तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन गावकऱ्यांना होत आहे. सध्या शेतशिवारात खरीप हंगामातील रोवणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात जातात. बोरगाव येथील शेतकरी शनिवारी शेतात गेले होते. याच गावातील प्रितीलाल पारधी आपल्या शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना आतमध्ये दुर्मिळ असलेला खवल्या मांजर दिसला. त्यांनी ही माहिती शेतकऱ्यांना दिली.
खवल्या मांजराची प्रजाती विलूप्त होण्याच्या मार्गावर असून या परिसरात प्रथमच त्याचे दर्शन झाले. खवल्या मांजराला वनविभागाच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हरदोली वनविभाग कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक एच.के. येरणे यांना माहिती देण्यात आली. बीट रक्षक एस.ए. गायकवाड, ए.जे. वासनिक, एन.एस. हुकरे आणि सुमीत देव्हारे शेतशिवारात आले. त्यानंतर खवल्या मांजराला ताब्यात घेऊन वनकार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी या खवल्या मांजराची वनविभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली.
दहा किलो वजनाचे खवल्या मांजर असून अतिशय दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळखली जाते. यानंतर वनविभागाच्या चमूने शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खवल्या मांजराला जंगलात सोडून दिले. खवल्या मांजर बोरगाव परिसरात आढळल्याची माहिती होताच परिसरातील गावकºयांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. खवल्या मांजराची चर्चा दिवसभर चांदपूर परिसरात शनिवारी सुरु होती.

बोरगाव येथील शेतशिवारातील विहिरीत दुर्मिळ खवल्या मांजर आढळल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यात आले. खवल्या मांजराला कोणतीही जखम वा दुखापत झालेली नव्हती. शासकीय सोपस्कार पूर्ण करून खवल्या मांजराला जंगलात सोडून देण्यात आले.
- एच.के. येरणे, क्षेत्र सहाय्यक, हरदोली

मॅनीस प्रजातीचा सस्तन प्राणी
खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जीभ वापरून तो आपले भक्ष्य पकडतो. नैसर्गिक अधिवास संपत असल्याने खवल्या मांजराचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेकदा त्याची शिकारही केली जाते. त्यामुळे खवल्या मांजराला संरक्षित प्राण्याच्या सूचित समाविष्ट करण्यात आले आहे. अतिशय लाजाळू असणारा खवल्या मांजर आता चांदपूर परिसरात आढळल्याने कुतूहलाचा विषय झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग