अंत्यसंस्कारावरून परतताना शिक्षकावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:30+5:30

वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. अंत्यसंस्कार आटोपून दुपारी ते आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी कोथुर्णा येथील विशाल खोकले या तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली.

Put time on the teacher when returning from the funeral | अंत्यसंस्कारावरून परतताना शिक्षकावर काळाचा घाला

अंत्यसंस्कारावरून परतताना शिक्षकावर काळाचा घाला

ठळक मुद्देसोमनाळा येथे कोसळली वीज : एक तरूण गंभीर जखमी, विरली येथे होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बुज.) : नातेवाईकाचा अंत्यसंस्कार आटोपून दुचाकीने घरी पतरताना एका शिक्षकावर काळाने घाला घातला. पवनी तालुक्यातील सोमनाळा येथे बुधवारी दुपारी वीज कोसळून शिक्षकाचामृत्यू तर एक तरूण गंभीर जखमी झाला.
वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. अंत्यसंस्कार आटोपून दुपारी ते आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी कोथुर्णा येथील विशाल खोकले या तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली. दोघेही दुचाकीने पवनीकडे जात असताना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा गावाजवळ विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. काही कळायच्या आत एक वीज अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. हा प्रकार सोमनाळाच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या दोघांनाही अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी वैद्य यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
वामन वैद्य हे गत १२ वर्षापासून विरली बुज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
 

Web Title: Put time on the teacher when returning from the funeral