शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता अधांतरी

By admin | Updated: October 16, 2014 23:20 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत

भंडारा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या हेतूने समाजकल्याण (राज्य) कार्यायलाची निर्मिती करण्यात आली. मात्र निकषाप्रमाणे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्तीसह देण्यात येणारा निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या खातेपुस्तिकांवर जमा झाला नसल्याने विद्यार्थी या भत्त्यापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांचा पैसा कुठे गायब झाला हा प्रश्न अधांतरी आहे. या आशयाची विचारणा विद्यार्थी करू लागला आहे.महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. यात अनुसूचित जाती, जमाती व इतर जातीतील विद्यार्थी तसेच अन्य प्रवर्ग वगळता शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क मिळून शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात येते. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निर्वाह भत्ता जमा करून उर्वरीत सर्व रक्कम संबंधित महाविद्यालयकडे सोपविण्यात येते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृती वेळेवर मिळावी आणि शिष्यवृत्ती त्याच वर्षी मिळावी यासाठी शासनाने सन २०१२ पासून आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला बँकेत खाते उघडून त्याचे खाते क्रमांक समाजकल्याण विभागाकडे पाठविणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ही योजना काटेकोरपणे राबविली. मात्र पाच वर्र्षांपासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता जमा झालाच नाही. निर्वाह भत्त्याची रक्कम मिळत नसेल तर शिष्यवृत्तीची गरज काय असा प्रश्न विद्यार्थी उपस्थितीत करीत आहेत. अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांला पाच हजार ५०० रुपये तर अन्य गटाला जवळपास २००० रुपये भत्ता मिळतो. समाजकल्याण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता त्यांच्या खात्यात जमा करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)