शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर अळींचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 9, 2014 23:15 IST

शेतकऱ्यावर कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला असून धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले आहे. त्यात काही धान पिके फस्त झाली असून काही धानपिकावर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

बारव्हाा : शेतकऱ्यावर कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला असून धानपिकावर विविध रोगाने आक्रमण केले आहे. त्यात काही धान पिके फस्त झाली असून काही धानपिकावर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची किटकनाशक औषधांची फवारणी करीत आहे. मात्र रोग आटोक्यात येत नाही. तरी शासनाने कृषी विभागामार्फत सवलतीच्या दरात किटकनाशक औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी बारव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकरी स्वत:च्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वतोपरी प्रयत्नाची फसगत होत असून बळीराजा कर्जाच्या कचाट्यात दिवसेंदिवस फसत आहे. मागील तीन वर्षापासून कधी पूर, महापूर व अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस आणि त्यात भर म्हणून विविध धानपिकांवर रोगांचे आक्रमण अशा कालचक्राचा सामना करताना बळीराजाला शेतीसाठी खर्च अधिक तर त्या बदल्यात उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र बळीराजा आशावादी असल्याने आज ना उद्या निसर्ग साथ देईल व कर्जाची परतफेड करू या आशेवर दरवर्षी शेतीकामात जोमाने लागतो व शेती कसतो. यावर्षी तर पावसाळा ऋतूला सुरुवात होऊनही दीड महिना पाऊस पडलाच नाही. शेतात पेरलेले धान्य जागीच फस्त झाले. दुबार पेरणीकरून शकीबशी शेतात रोवणी केली. मात्र कधी पाऊस पडतो तर कधी पडत नाही. अशा परिस्थितीत धान्य पिके वाळण्याच्या तारनेत आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी शेतीला पाणी दिले. मात्र ज्यांच्याकडे निसर्गाच्या पावसाशिवाय काहीच नाीह त्यांचे काय? सध्या धान पिक काडीवर, गर्भावस्था आलेली असून त्यांच्यावर खोडकिडा, अळी, करपा, तुडतुडा आदी रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. सदर रोगावर दुबार, तिबार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाही तरी शासनाने याची दखल घेत कृषी विभागामार्फत सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरात शेतकऱ्यांनी केली आहे.