धानाचे अवशेष न जाळता सेंद्रिय खत तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:51+5:30

दिवसेंदिवस शेतीत विविध प्रयोग साकारले जात आहेत. जमिनीचा पोत कायम राहून खर्च कमी करीत अधिक उत्पन्नकरिता कृषी विभाग विविध प्रयोग करीत आहे. असाच एक प्रयोग तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला आहे. यात दिल्ली इथून पुसा वेस्ट डिकम्पोझर कॅप्सूलची मागणी करून त्यापासून वेस्ट डिकम्पोझर  द्रावण तयार केले गेले.

Prepare organic manure without burning grain residues | धानाचे अवशेष न जाळता सेंद्रिय खत तयार करा

धानाचे अवशेष न जाळता सेंद्रिय खत तयार करा

googlenewsNext

मुखरू बागडे 
पालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बऱ्याच शेतात धानाचे अवशेष कायम आहेत. त्या अवशेषांना जाळण्यासाठी बरेच शेतकरी पुढाकार घेतात. परंतु आता नव्या संशोधनात जैविक प्रक्रियेतून अवशेषांना वेस्ट डिकम्पोझरची फवारणी करून सेंद्रिय खत तयार होऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर लाखनी तालुक्यातील कोलारी येथे सुरेश नांदगावे यांच्या शेतावर प्रयोग करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस शेतीत विविध प्रयोग साकारले जात आहेत. जमिनीचा पोत कायम राहून खर्च कमी करीत अधिक उत्पन्नकरिता कृषी विभाग विविध प्रयोग करीत आहे. असाच एक प्रयोग तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला आहे. 
यात दिल्ली इथून पुसा वेस्ट डिकम्पोझर कॅप्सूलची मागणी करून त्यापासून वेस्ट डिकम्पोझर  द्रावण तयार केले गेले. या द्रावणाचा वापर करून शेतातील काढणी झालेल्या पिकांच्या अवशेषावर फवारणी केल्यास त्यांचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. एकंदरीत अवशेष जळणाने हवेतील प्रदूषण कमी करून सेंद्रिय खत तयार होण्याचा प्रयत्न अथवा प्रयोग सुरू झालेला आहे. लाखनी तालुक्यातील कोलारी येथे कृषी सहाय्यक जे. यु. नाकाडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी विजयकुमार बावनकुळे, विजय हेमने व इतर शेतकरी उपस्थित होते.

द्रावण तयार करण्याची कार्यपद्धती
- पाच लीटर पाण्यात दीडशे ग्रॅम गूळ टाकून गूळ विरघळेपर्यंत गॅसवर गरम करणे. वरील गुळ पाणी गाळून थंड झाल्यानंतर ५० ग्रॅम बेसन घालून ढवळणे. त्यानंतर पुसा वेस्ट डिकंपोझर चार कॅप्सूल मोकळ्या करून त्यातील जिवाणू संवर्धक वरील मिश्रणात घालून ढवळणे व चार दिवस भांड्याला कपडा बांधून सावलीत ठेवणे. चार दिवसानंतर तयार झालेल्या द्रावणात पुन्हा साध्या पाच लीटर पाण्यात १५० ग्रॅम गूळ घेऊन गरम करून थंड द्रावण गाळून वरील चार दिवस तयार झालेल्या द्रावणात घालावे व नंतर दोन दिवस सदर भांड्याला कापडी कपडा बांधून ठेवावे. वरील तयार झालेले द्रावण १५ लीटर पंपाला ७५० मिली वापरून धानाच्या अवशेषावर फवारणी करावी व नंतर नांगरटी करून जमिनीत गाडून टाकावे. दहा लीटर द्रावण एक एकर क्षेत्राला अपेक्षित आहे. 

शेतकरी मित्रांनी पुसा वेस्ट  डिकंपोझरचा प्रयोग करावा. सुपीक शेतीकरिता हा प्रयोग अत्यल्प खर्चात घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. काही समस्या आल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी तत्पर आहोत.
-जे. यु. नाकाडे,  कृषी सहाय्यक, मंडल कृषी कार्यालय, पालांदूर.
शेतकऱ्यांनी प्रयोगाखातर प्रयत्न करून शेतीला पूरक सेंद्रिय खताचा वापर करावा. हळूहळू रासायनिक शेती कमी करावी. अर्थात खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. खर्च कमी झाल्यास व उत्पन्न वाढल्यास निश्चितच शेती फायद्याची ठरेल. होतकरू शेतकऱ्यांनी निश्चितच प्रयोगाकरिता पुढे यावे.
-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.

 

Web Title: Prepare organic manure without burning grain residues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती