शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:00 AM

जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धेची तयारी केली जात आहे. मैदानाची आखणी, मंडप उभारणी तसेच राज्यभरातून येणाऱ्या खेळाडू, संघ व्यवस्थापक, कोच यांच्या निवासाची, भोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील संघ होणार दाखल : भंडारा येथील स्पर्धेत ४८४ खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया अंतर्गत राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन येथे ७ नोव्हेंबरपासून करण्यात येत असून या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातील ४८४ खेळाडू सहभागी होणार आहेत.जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धेची तयारी केली जात आहे. मैदानाची आखणी, मंडप उभारणी तसेच राज्यभरातून येणाऱ्या खेळाडू, संघ व्यवस्थापक, कोच यांच्या निवासाची, भोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.७ ते ९ नोव्हेंबरपर्यत आयोजि या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेची तयारी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. काही महिन्यापूर्वी मैदानाची दुरावस्था झाली होती. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाडूंना खेळण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे खेळाडुंनी पाठ फिरविली होती. मात्र आता राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाचे यजमान पद भंडारा जिल्ह्याला मिळाले. त्यानिमित्ताने येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे भाग्य उजळून निघत आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि प्रशासनाच्या वतीने या मैदानाच्या दुरूस्तीचे काम गत आठ दिवसापासून हाती घेण्यात आले आहे. सर्वप्रथम या मैदानावरील अडथडे दूर करण्यात आले. त्यानंतर या मैदानाच्या परिसरात लाल माती टाकून योग्यपद्धतीने दबाई करण्यात आली. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची चमू राबताना दिसत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा कमतरतेचा सामना करावा लागतो. मात्र या परिस्थतीत विविध क्रीडा संघटनांची मदत घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मैदानाच्या दुरूस्तीसाठी हातभार लावत असल्याचे चित्र गत काही दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर दिसत आहे. राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील खेळाडू भंडारा शहरात दाखल होणार असून त्यांच्या निवासासह सोयी सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने केला जात असल्याचे सांगण्यात आले.