वैनगंगेत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:53+5:302021-03-13T05:03:53+5:30

कुंदा रमेश कुंभलकर (३३) आणि नाशिक महादेव बावनकुळे (२८, रा. शुक्रवारी भंडारा) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही ...

Premiyugula commits suicide by jumping into Waingang | वैनगंगेत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

वैनगंगेत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

कुंदा रमेश कुंभलकर (३३) आणि नाशिक महादेव बावनकुळे (२८, रा. शुक्रवारी भंडारा) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या दिवाणघाटावर महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटविली असता ती कुंदा कुंभलकर असल्याचे पुढे आले. त्याच परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता दुपारी ३.३० वाजता नाशिकचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. कुंदा ही एका किराणा दुकानात कामाला होती. तिला १४ वर्षांचा मुलगा आणि ११ वर्षांची मुलगी आहे, तर नाशिकचे भाजीपाल्याचे दुकान असून, तो अविवाहित आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी भेट दिली. या घटनेची माहिती शहरात पसरताच अनेकांनी दिवाणघाटाकडे धाव घेतली होती.

Web Title: Premiyugula commits suicide by jumping into Waingang