शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच्या नावावर तरुण बेरोजगारांची लूट

By admin | Updated: May 23, 2017 00:21 IST

भारत ति सीमा पोलीस बलाच्या आयटीबीपी सरळ सेवा भरतीच्या नावावर तालुक्यातील शेकडो बेरजगार युवकांना कोणतीही लेखी फिजीकल न घेता ....

विद्यार्थ्यांना पाठविले खोटे नियुक्तीपत्र : १८७५० रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारत ति सीमा पोलीस बलाच्या आयटीबीपी सरळ सेवा भरतीच्या नावावर तालुक्यातील शेकडो बेरजगार युवकांना कोणतीही लेखी फिजीकल न घेता खोेटे नियुक्ती पत्र पाठवून बेरोजगार तरुणांची लुट करण्याचा प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे.आयटीबीपी भारत तिब्बत सीमा पोलीस बलाची भरतीही सन २०१५ ला निघाली असता तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांनी सरळ सेवेकरिता आवेदन केले होते. परंतु फिजीकल टेस्ट मध्ये अनफिट झाल्याने अनेक बेरोजगारांना माघारी परतावे लागले होते. परंतु आता दीड ते दोन वर्षानंतर त्याच अनफिट झालेल्या युवकांना त्यांच्या घरच्या पत्यावर भारत तिब्बत सीमा पोलीस बलाचे खोटे नियुक्ती पत्र पाठविण्यात आले आहे. त्या नियुक्तीपत्रात लेखी स्वरुपात लिहिले आहे की, भारत सरकारने तुमची आयटीबीपी करिता निवड करण्यात आलेली आहे. ५२०० प्रमाणे ग्रेड पे वेतन दिल्या जाणार आहे. सदर नियुक्तीपत्र मिळताच नियुक्ती पत्रात दिलेल्या बँक खात्यामध्ये ४८ तासाच्या आत १८,७५० रुपये जमा करून पैसे जमा केल्याची खातरजमा केल्याशिवाय जॉईनिंगचे ठिकाण सांगणार नाही असे स्पष्ट उल्लेख नियुक्तीपत्रात असल्याने बेरोजगारांनी खात्यात पैसे टाकले. त्यानंतर त्या क्रमांकावर संपर्क होत नसल्यामुळे गंडविल्या गेल्याची प्रचिती आली. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी भरलेल्या सरळ सेवा भरतीचे आवेदनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती भरली होती. त्या पत्यावरच आयटीबीपी मार्फत पत्रव्यवहार होत असून बेरोजगारांना गंडविण्याच्या व्यवहारात आयटीबीपीचे मोठे अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी नाहीत ना अशी शंका बळावली असून सदर प्रकरणाची चौकशीची मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.