शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धानपीक धोक्यात

By admin | Updated: October 21, 2014 22:45 IST

विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही

भारनियमनामुळे शेतकरी चिंताग्रस्त : नियमित वीजपुरवठ्याची मागणीभंडारा : विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही. कृषिपंपांचे भारनियमन वाढले असल्याने खरीप हंगामातील धानपिक धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना नियमित वीज देण्याची मागणी केली जात आहे.कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा संकटाने शेतकरी पूर्णत: खचला आहे. संत्रा आंबिया बहरावर संत्रा उत्पादकांनी समाधान मानले. परंतु पावसाने एक महिन्यापासून दडी मारल्याने शेतातील पीक करपू लागली आहे. विहिरीत पाणी आहे. परंतु वीज भारनियमनामुळे शेतकऱ्यांना ओलीत करता येत नाही. यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. अभियंते म्हणतात, भारनियमनाचे अधिकार आमच्याकडे नाही यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून तातडीने वीज भारनियमन कमी करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही भारनियमन कमी झाले नाही. तालुक्यात कृषी पंपाकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित असतो.भारनियमन वाढल्याने अनेकांना भारनियमनाचा फटका बसायला लागला आहे. काही भागात विद्युत रोहित्रांत बिघाड तर काही भागांत वीजपुरवठा खंडित करावा, अशी अवस्था असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित. एकीकडे निवडणुकीत कोट्यवधी रूपयांची उधळण तर दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिंता आहे. डौलदार पिकांना ओलीत करण्याची गरज असताना विजेअभावी ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (शहर प्रतिनिधी)