शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीची मर्यादा साडेआठ लाख क्विंटलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :  धान खरेदीच्या मर्यादेवरून जिल्ह्यात वादळ उठले असताना शासनाने आता धान खरेदीची मर्यादा पाच लाखांहून साडेआठ लाख क्विंटलवर केली आहे. याबाबत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवारी नवीन परिपत्रक काढले आहे. मर्यादा वाढविली असली तरी तीही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा रोष कायम आहे. संपूर्ण धान खरेदीची शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.

१५ जूनपर्यंत धान खरेदी

- जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवार ६ जूनला काढलेल्या नव्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत सुरू असलेल्या सर्व संस्थांना रब्बी पणन हंगाम २०२१- २०२२ साठी जुन्या पत्रकानुसार धान खरेदीकरिता ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. नव्या पत्रकानुसार उद्दिष्ट तीन लाख ७७ हजार ५४७ क्विंटल वाढविण्यात आलेले आहे. त्यामुळे आता खरेदीचे उद्दिष्ट आठ लाख ६९ हजार ५४४ क्विंटल ठरवून दिल्याचे म्हटलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्रनिहाय नसून जिल्हानिहाय आहे. तसेच आपल्या खरेदी केंद्रावर १५ जूनपर्यंत धान खरेदीचे काम पूर्ण करावयाचे आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड