शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला व्हॅटीलेटर कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक डॉ.रुपेश थोटे यांनी करून दाखविले. मॉक ड्रिलमध्ये आरोग्य यंत्रणा अगदी सज्ज असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती । रुग्णवाहिकेपासून सॅम्पल आणि व्हॅटिलेटरचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी ऐन वेळेवर एखादा कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाला तर रुग्णालयाची कशीतयारी आहे याचा आढावा जिल्हा प्रशासनाने शनिवारी मॉक ड्रिलच्या माध्यमातून घेतला. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये रुग्णवाहिकेपासून तर व्हॅटीलेटर पर्यंतचे प्रात्यक्षिक घेऊन तयारीचा आढावा घेतला.भंडारा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. परंतु वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष, आयसोलेशन वॉर्ड तयार आहे. मात्र ऐनवेळी एखादा कोरोनाचा रुग्ण आला तर वैद्यकीय यंत्रणा कसा प्रतिसाद देते याची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली. या मॉक ड्रिलमध्ये दोन अ‍ॅम्बुलन्स सहभागी झाल्या होत्या. अ‍ॅम्बुलन्समधून आणलेला डमी रुग्ण थेट विलगीकरण कक्षात नेण्यात आला.तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला व्हॅटीलेटर कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक डॉ.रुपेश थोटे यांनी करून दाखविले. मॉक ड्रिलमध्ये आरोग्य यंत्रणा अगदी सज्ज असल्याचे दिसून आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, डॉ.सुनिता बढे, नोडल आॅफीसर पियुष जक्कल उपस्थित होते. मॉक ड्रिलमध्ये दोन अ‍ॅम्बुलन्स सह दहा डॉक्टरांचे पथकही सहभागी झाले होते. रुग्णालय सुसज्ज असल्याचे मॉकड्रिलमध्ये आढळून आले.जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी यावेळी रुग्णालयाची पाहणी केली. तेथे किरकोळ दुरुस्तीचे कामे तात्काळ करण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार यांना देण्यात आले. तसेच वीज व्यवस्था आणि फायर फायटिंगची व्यवस्था तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्ह्यातील ३० व्यक्तींचे नमुने निगेटीव्हयेथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आयसोलेशन वॉर्डआणि विलगीकरण कक्षात दाखल व्यक्तीच्या पाठविलेल्या घशातील स्वॅपच्या नमुन्यांपैकी ३० जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही करोनाबाधीत रुग्ण आढळला नसून प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. सध्या विलगीकरण कक्षात ३५ आणि आयसोलेशन वॉर्डात सात जण दाखल आहेत. येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ३५ जण दाखल असून आतापर्यंत तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्डात सात जण उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या