शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील मत्स्य विभागाची कामे होतात भंडाऱ्यातून

By admin | Updated: September 18, 2014 23:30 IST

तुमसर येथे मागील ३० वर्षापासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी हे कार्यालय सुरु आहे. चार वर्षापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले होते. याशिवाय येथे चार कर्मचारी होते.

तुमसर : तुमसर येथे मागील ३० वर्षापासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी हे कार्यालय सुरु आहे. चार वर्षापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले होते. याशिवाय येथे चार कर्मचारी होते. कालांतराने त्यांचेही स्थानांतरण झाले. सध्या स्थितीत एकच चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाशी संबंधित कामे सध्या थेट भंडाऱ्यातून सुरु आहे. तुमसर शहरात भाड्याच्या इमारतीत सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचा पत्ता शोधूनही सापडत नाही. कारण या कार्यालयाचा साधा फलक तेथे नाही. चतुर्थश्रेणी महिला कर्मचारी सकाळी १० वाजता कार्यालय सुरु करतात व सायंकाळी ५ वाजता बंद करतात. सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले तेव्हापासून हे पद रिक्त आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यामुळे ते पदही रिक्त आहे. सध्या नागठाणा येथून चतुर्थश्रेणी कर्मचारी येथे दररोज येतात. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित कामे भंडाऱ्यातून होत आहेत. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मासेमार बांधवांना योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता राज्य शासनाने तालुकास्तरावर मत्स्य कार्यालय सुरु केले आहेत. परंतु या कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तुमसर येथील कार्यालयांतर्गत जलसंपदा विभागाची १५ तलाव तर जिल्हा परिषदेचे १२० ते १२५ तलाव येतात. या कार्यालयांतर्गत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना मदत करणे, माहिती देणे, प्रशिक्षण देणे आदी कामे केली जातात. परंतु कर्मचारी व अधिकाऱ्यांअभावी सर्व कामे येथे कायदोपत्री सुरु आहेत.या कार्यालयाचे दार उघडेच असतात. या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलवर स्वच्छता करणारे झाडू व डस्टबीन टेबलवरच ठेवलेले दिसून आले. राज्य शासनाचे हे कार्यालय आहे का? हे यावरून दिसून येते. शासनाचे भाड्यापोटी हजारो रुपये व्यर्थ जात आहेत. आर्थिक भुर्दंड यासंदर्भात मच्छींद्रनाथ मत्स्य पालन सहकारी संस्थेचे सचिव संजय मोहनकर म्हणाले, या कार्यालयामार्फत जाळे, डोंगे, निविदा, मार्गदर्शनासंदर्भात कार्यालयाशी संपर्क येतो. परंतु कर्मचारी व अधिकारी नसल्याने भंडारा येथे जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)