शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पहिल्या दिवशी शाळा उघडणार नाही

By admin | Updated: June 13, 2017 00:18 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही आश्वासनानंतरही तोडगा काढलेला नाही.

कृती समितीचा निर्णय : १७ ला होणार शिक्कामोर्तब, शिक्षकांच्या मागण्यांवर जि.प. प्रशासनाचे आश्वासनाचे गाजरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही आश्वासनानंतरही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे जि.प. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास २७ जून पासून सुरु होणाऱ्या शाळा उघडणार नसल्याचा निर्णय आज झालेल्या शिक्षक कृती समितीत घेण्यात आला. मागील आठ महिन्यांपासून जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व केंद्र प्रमुखांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक जि.प. प्रशासनाशी संघर्ष करीत आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येवून शिक्षक कृती समितीचे गठण केले. यानंतर अनेकदा आंदोलने करण्यात आली. यावर जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलन थांबविण्यासाठी आंदोलनकर्त्या शिक्षक नेत्यांना आश्वासने दिलीत. मात्र तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मागण्यांची पूर्तता झालेली नाही. जि.प. प्रशासनाने आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने शिक्षक कृती समितीने याबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने आज सोमवारला जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास २७ जून ला शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीपासून शाळा सुरु न करता त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला अंतिम स्वरुप देण्याकरिता १७ जूनला तालुकास्तरीय सर्व संघटना व जिल्हास्तरीय कृती समिती यांची संयुक्त सभा बोलाविण्यात आली आहे. ही सभा दुपारी १२ वाजता ग्राहक भंडार येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मागण्यासंदर्भात चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचा आजच्या सभेत निर्णय घेण्यात आला. या सभेला मुबारक सैय्यद, ओमप्रकाश गायधने, विकास गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, वसंत साकुरे, जयंत उपाध्ये, मुकुंद ठवकर, प्रमोद ठमे, सुनिल वाघमारे, संदीप वहिले, हरिकिसन अंबादे, मुकेश मेश्राम, सुधाकर ब्राम्हणकर, रमेश पारधीकर आदी उपस्थित होते.