कोविड केअर सेंटरमधील पीपीई कीट उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:36+5:30

सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूवातीपासूनच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. महापुराचे पाणी या कोविड केअर सेंटरमध्ये शिरले होते. त्यानंतर पुरेशी देखभाल न करताना येथेच पुन्हा रुग्णांना ठेवले जात आहे.

At the opening of the PPE kit at Covid Care Center | कोविड केअर सेंटरमधील पीपीई कीट उघड्यावर

कोविड केअर सेंटरमधील पीपीई कीट उघड्यावर

ठळक मुद्देसिंदपुरी येथील प्रकार । विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कोविड केअर सेंटरमध्ये वापरलेल्या पीपीई कीटची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे निर्देश असतानाही पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे पीपीई कीट उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे विविध समस्या निर्माण झाल्या असून याठिकाणी नियुक्त केलेल्या शिक्षकांना मनस्त:प सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूवातीपासूनच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. महापुराचे पाणी या कोविड केअर सेंटरमध्ये शिरले होते. त्यानंतर पुरेशी देखभाल न करताना येथेच पुन्हा रुग्णांना ठेवले जात आहे.
येथील रुग्णांना तपासताना डॉक्टर व कर्मचारी पीपीई कीटचा उपयोग करतात. मात्र त्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट केली जात नसल्याचे दिसून येते. शनिवारी वापरलेले पीपीई कीट कोविड केअर सेंटरच्या लगतच फेकून दिल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांनी याबाबत वरिष्ठांकडे माहिती दिली आहे. परंतु उपाययोजना केल्या जात नाही.
रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रशासनाने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. कोविड सेंटर सांभाळणारे डॉक्टर, कर्मचारी या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथे नियुक्त करण्यात आलेले शिक्षक करीत आहे. गंभीर बाब म्हणजे वापरलेल्या पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे या पीपीई कीटशी कुणाचा संपर्क आल्यास कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे कार्यरत शिक्षकांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून येथे नियुक्त शिक्षकांना सुविधा द्यावी आणि पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: At the opening of the PPE kit at Covid Care Center