शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रात धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देसुरक्षाभिंतही नाही : चौकीदाराअभावी साहित्य चोरीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीची भिती कायम असते.शेतकºयांच्या जिव्हाळ्याचे खरेदी केंद्र म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्र या केंद्रावर शासनाच्या ठरलेल्या दरानुसार धानाचे एकमुस्त पैसे बँक खात्यावर जमा होतात. या विश्वासावरच शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता नेतात. यावर्षीच्या नविन नियमानुसार प्रत्येक शेतकºयाला धान विक्रीला आणल्या नंतर आधी सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणून आधी आॅनलाईन अर्ज करावा लागतो.या अर्जानतर जो नंबर मिळाला असेल त्या नंबरनुसार धानाचे वजन केले जाते. यासाठी कधीकधी एक दोन दिवसाचा वेळ लागतोच. तोपर्यंत शेतकºयांना धान उघड्यावरच स्वत:च्या भरोशावर धान तसाच ठेवावा लागतो.दिवसा या खरेदी केंद्रावर लोकाची ये-जा राहते मात्र रात्री हे खरेदी केंद्र सुनसान होतात. रात्री येथे चौकीदारही नसतो. त्यामुळे धान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी श्रीराम सहकारी भात गिरणी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रातून रात्री सदु कापगते याचे आठ ते दहा धानाचे बोरे चोरीला गेले होते. याची पोलिसात तक्रारही झाली होती. मात्र तरीही रता्रीचा चौकीदार अजुनपर्यंत ठेवण्यात आला नाही. जर रात्री अचानक पाऊस आला तर धान ओले होऊ शकतात.यासाठी शेडचीही व्यवस्था नाही. तर या खरेदी केंद्रावर दिवसभर शेतकरी व इतराची ये-जा सुरु असते. धान वजन करणे, हुंडी तयार करणे हे काम दिवसातच सुरु असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोाातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहे. मात्र अनेक केंद्रावर तेही लावण्यात आलेले नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या सुधारणा कराव्यात अशी शेतकºयांची मागणी आहे.