शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तब्बल 828 लोकांमागे केवळ एकच पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात छोट्या-मोठ्या गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी असले, तरी दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यस्तरावर ऑनलाइन पैसे काढल्याच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लॉटरी लागली आहे, अल्पावधीत कर्ज मंजूर करून देतो. मी बँकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा. तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत, अशी विविध कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने प्रकार वाढले आहेत.

ठळक मुद्देकामाचा ताणतणाव वाढतोय : पोलीस मित्रांची घेतली जाते मदत

संतोष जाधवर 
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. मात्र, एवढी लोकसंख्या असताना त्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे दिसून येते. १२ लाख ३३४ एवढ्या लोकांचा भार केवळ १५४० पोलिसांवर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकर राबवण्याची गरज आहे. 
वाढत्या लोकसंख्येनुसार ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारासह वेगवेगळ्या  गुन्हेगारीला थोपविण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलापुढे आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात १४३३ पोलीस कर्मचारी, १११ पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. बारा लाख लोकसंख्या असताना ८२८ लोकांची सुरक्षितता केवळ एकाच पोलिसावर आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे हळूहळू सर्वच कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली असल्याने मोर्चे, निवडणुका, आंदोलने यांच्यासह अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण अधिक पडत आहे. मात्र, असे असले तरी मंत्र्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले असल्याने सुरक्षिततेसाठी पोलिसांना नेहमीच दक्ष राहावे लागत आहे.  

ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान 
 जिल्ह्यात छोट्या-मोठ्या गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी असले, तरी दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यस्तरावर ऑनलाइन पैसे काढल्याच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लॉटरी लागली आहे, अल्पावधीत कर्ज मंजूर करून देतो. मी बँकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा. तुमचे कर्जाचे हप्ते थकले आहेत, अशी विविध कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे एटीएममध्ये असणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा फायदा घेत होत असलेल्या तक्रारीचाही अनेक जण फायदा घेत आहेत. यामुळे ऑनलाईन गुन्ह्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी हे वाढत्या लोकसंख्येपुढे कमी पडत आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. 

शेतशिवारातील चोरीच्या घटनांच्या प्रमाणात वाढ 

 जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास न झाल्याने शेती हाच अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांनी शेतात लावलेले मोटारपंप तसेच केबल वायर, पॅकहाउस बांधकाम केलेल्या साहित्याची चोरी तसेच शेळीपालन असलेल्या ठिकाणी बोकडचोरी केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात या वर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरापेक्षाही ग्रामीण भागातील शेतशिवारातून कृषीपंपचोरी होण्याच्या घटना वाढल्या असल्याने त्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस