पहिल्या वर्गात ७१ टक्के मुलांचा ऑनलाईन प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:42+5:30

जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे.

Online admission of 71% children in the first class | पहिल्या वर्गात ७१ टक्के मुलांचा ऑनलाईन प्रवेश

पहिल्या वर्गात ७१ टक्के मुलांचा ऑनलाईन प्रवेश

ठळक मुद्दे९७३४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत। पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया यंदा १ मेपासून सुरू करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात दाखलपात्र १३ हजार ७२७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३३ मुले तर ६ हजार ७२२ मुली आहेत. यापैकी ४ हजार ९१७ मुले व ४ हजार ८६६ मुलींनी असे ९ हजार ७३४ चिमुकल्यांचा पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात दाखलपात्र असलेल्या मुलामुलींपैकी ७०.९० टक्के मुलामुलींनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे त्या शाळांची पटसंख्या सुद्धा वाढली आहे.
जि.प.शाळांतील विद्यार्थी संख्या घटू नये यासाठी यंदापासून वर्ग पहिलीत ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. आमगाव तालुक्यात ८७ शाळांत ८१६, सालेकसा तालुक्यात ८८ शाळांत ६८०, देवरी तालुक्यातील १३३ शाळांत १०३८ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यात १०२ शाळांत १ हजार ६९, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १२० शाळांत १ हजार ३०९, गोरेगाव तालुक्यात १०२ शाळांत ९९६, तिरोडा तालुक्यात १४२ शाळांत १ हजार ५१४ व गोंदिया तालुक्यात २०२ शाळांत ९९६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे.
प्रत्येक शाळेत डिजीटल साधन असून त्याचा नियमित वापर करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने (महाराष्ट्र शासन) दिक्षा अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन अभ्यासक्र म शिकविले जाते. यातूनच आता १ मेपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

Web Title: Online admission of 71% children in the first class

टॅग्स :Schoolशाळा