शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळ्यातून एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: April 12, 2016 00:42 IST

क्षुल्लक कारणातून समाजात जातीय तेढ निर्माण होते.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : डोंगरला येथे माळी समाजाचा विवाह सोहळा, संसारोपयोगी साहित्यांचे वाटपभंडारा : क्षुल्लक कारणातून समाजात जातीय तेढ निर्माण होते. अशा स्थितीत समाजाला एकत्र आणण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आता काळाची गरज ठरली आहे. यातून समाजबांधव एकत्र येतात. यामुळे समाजातील एकोपा दिसून येते, अशी प्रतिक्रिया खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली. तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे महात्मा जोतिबा फुले बहुउद्देशीय विकास मंडळाच्या वतीने रविवारला सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार नाना पटोले यांच्यासह आमदार चरण वाघमारे, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, भंडाराचे नगराध्यक्ष बाबु बागडे, माजी आ. मधुकर कुकडे, अनिल बावनकर, बंडू बनकर, शंकर राऊत, तारिक कुरैशी, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश हटाळकर, राजेंद्र पटले, अ‍ॅड. रविकिरण भुसारी, सीमा भुरे, परसराम आंबेकर, नामदेव कांबळे, शंकर कांबळे, सुभाष राऊत, जोशी नेरकर, किशोर मांदाळे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी माळी समाज बांधव हा पारंपरिक व्यवसायात गुुंतला आहे. स्वत:सह समाजाच्या उत्थाणासाठी समाज बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. यातून प्रगती साधून आर्थिक उन्नती करावी. राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. ही चिंताजनक बाब असून सर्व शेतकरी बांधवांनी आत्महत्या करण्याऐवजी शेतीतून उत्पादन प्रक्रियेकडे लक्ष देण्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. आमदार चरण वाघमारे यांनी, समाजातील तळागाळातील बांधवांना एका धाग्यात बांधण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आदर्श निर्माण करीत आहो. यातून वधू व वरांच्या पालकांची आर्थिक बचत होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मागील नववर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या सोहळ्यात जिल्ह्यासह मध्य प्रदेशातीलही युवक विवाह बंधनात अडकलेत. या कार्यक्रमात नव जोडपे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मान्यवरांच्या हस्ते नवदांम्पत्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)