पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 06:00 AM2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:39+5:30

तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत.

 The officers went back without a punch | पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

Next
ठळक मुद्देव्यथा चौरास भागातील : शेतकऱ्यांचा आरोप, तर मदत कशी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : परतीच्या पावसाने पावणेपाच एकरातील धान पीक मातीमोल झाले. या धानपिकांचा पंचनामा करण्यासाठी तलाठ्याकडे विणवनी करण्यात आली. पण सध्या पंचनामे करणे बंद झाले आहे, असे म्हणून शेतकºयाुा परतवून लावले. दोन लाख २५ हजाराचे धान गेल्याने कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न लिलाबाई येवले (७३) यांना पडला आहे.विशेष म्हणजे पंचनामे न करताच अधिकारी व कर्मचारी परत गेले, असा आरोप चौरास भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत. अनेक शेतकºयांचे धानाचे पीक परतीच्या पावसाने पुर्णत: गेले. पण कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत नाही, असे दिसत आहे.
सेंद्री बु. येथील शेतजमीन पालोरा चौ. तलाठी साझ्यात येते. येथील तलाठी वासनिक यांना लिलाबाई येवले (७३) यांच्यातर्फे मुलगा सुनील येवले यांनी पीक नुकसानीचा फोटो दाखविला. सर्व पीक परतीच्या पावसाने जमिनदोस्त झाले. कापणीला आलेले पीक लोटल्याने कीडीने पुर्णपणे फस्त केले. शंभर टक्के अनुदान झाले. त्यामुळे हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवासहकारी संस्थेचे पीक कर्ज ६७ हजार रासायनिक खताची उधारी २५ हजार व शेतीसाठी घेतलेले पतसंस्थेचे ५० हजार इतर कर्ज एक लाख ५० हजार रूपये कसे भरावे असा प्रश्न पडला आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेताना पीक विमा कपात केली म्हणून पीक विमा कंपनीच्या कर्मचाºयास फोन केला त तो देखिल शेतावर येण्यास तयार नाही. ‘सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल’, असे गोड बोलून आम्हची बोळवण करीत आहे. शेतातील नुकसान भरपाईचा पंचनामा केला नाही तर पीक विमा मिळेल, शासन आर्थिक मदत कशाच्या आधारे देईल, अशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांची झालेली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चौरास भागातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  The officers went back without a punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.