बोगस डॉक्टरांच्या हातात नाडी

By Admin | Updated: May 29, 2016 00:43 IST2016-05-29T00:43:08+5:302016-05-29T00:43:08+5:30

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ग्रामीण रूग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती आहे.

Nude in the hands of bogus doctors | बोगस डॉक्टरांच्या हातात नाडी

बोगस डॉक्टरांच्या हातात नाडी

आसगाव : ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ग्रामीण रूग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती आहे. यातून रूग्णांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असल्याने बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब व अशिक्षित रूग्णांना घरपोच आरोग्य सेवा देण्याकडे काही बोगस डॉक्टरांचा कल दिसून येतो. आधी गावातील प्रतिष्ठितांचा विश्वास संपादन करून नंतर मात्र आपली दुकानदारी चालविण्यावर या डॉक्टरांचा भर आहे. एखाद्याने या बाबत विरोध केल्यास त्याच गावातील इतर लोकांकडून अशा व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची योजनाही बोगस डॉक्टरांची असते. त्यामुळे कुणी विरोध करण्यास सहजासहजी पुढे येत नाही.
नागरिकांना उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रूग्णालयात यावे लागते. अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. हा खर्च प्रत्येकालाच शक्य होत नसल्याने स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर नागरिक भर देतात. परंतु हे डॉक्टर किती खरे व किती खोटे याची माहिती कुणालाही नसते. परिस्थितीनुसारच डॉक्टर रूग्णांवर उपचार करून पैसे कमवितात. ग्रामीण भागातील बहुतांश रूग्ण हे अशिक्षित असतात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी एखादे इंजेक्शन लावले, गोळ्या दिले की अशा रुग्णांचे मानसिक समाधान होते. यातून बऱ्याचदा अनेकांचा आजारही दूर होतो. अशाच मानसिकतेचा बोगस डॉक्टर लाभ उचलतात. अनेकांनी तालुक्यात विविध ठिकाणी आपले दवाखाने थाटले असून त्याद्वारे ते रूग्णांवर उपचार करतात. मात्र, या बोगस डॉक्टरांमुळे ग्रामीण रूग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nude in the hands of bogus doctors