शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्राॅपर्टी डीलर्सचा खून; चार लाखांची दिली सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

त्यानंतर श्रीकांतने तुमसर येथील मित्र आकाश महालगावे याला सोबत घेऊन ठार मारण्याचा कट रचला. ४ एप्रिल रोजी आकाश व ...

त्यानंतर श्रीकांतने तुमसर येथील मित्र आकाश महालगावे याला सोबत घेऊन ठार मारण्याचा कट रचला. ४ एप्रिल रोजी आकाश व श्रीकांत दुपारी १.३० वाजता दास यांच्या पोस्ट ऑफिसजवळील कार्यालयात गेले. मात्र, दास तेथे हजर नव्हते. तेथे असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने दास यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. आपल्याला प्लॉट विकत घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यावरून दास यांनी त्यांना रॉयल पब्लिक स्कूलजवळ बोलाविले. तिघेही बेला येथील राजीवनगरातील लेआऊटवर गेले आणि तेथेच गळा चिरून दास यांना ठार मारले.

पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून या प्रकरणाचा छडा लावत तिघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अरविंदकुमार जगने, पोलीस हवालदार बापूराव भुसावळे, प्रशांत भोंगाडे, अतुल मेश्राम, अजय कुकडे, भेनाथ बुरडे, गणेश मन्नाडे, संदीप बन्सोड यांनी केला.

बॉक्स

अवघ्या १२ मिनिटांत काम तमाम

समीरदास याने बोलाविल्याप्रमाणे तिघेही रॉयल पब्लिक स्कूलजवळ पोहोचले. बेला येथील ले-आऊटवर पोहोचल्यानंतर बोलता बोलता आरोपी श्रीकांत येरणे याने त्याच्याजवळील चाकू काढला आणि समीर यांच्या मानेवर जोरात वार केला. समीर यांना ओरडण्याची, बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. ते खाली कोळसळताच हे तिघेही पसार झाले. अवघ्या बारा मिनिटात त्यांनी समीर दास यांचे काम तमाम केले. विशेष म्हणजे हे तिघेही तोंडाला कापड बांधून होते. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण झाले होते. मात्र, पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लावला.