शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील चुरीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महार्गावर संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खरबी (नाका) ते मुजबी पर्यंत पावसामुळे रस्त्यावरील चुरी विखुरली असून रस्त्यावर खड्डे वाढल्याने अपघाताची भीती वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नवीन खड्ड्यांची भर पडत आहे. मात्र खड्डे बुजविणे, उखडणे पुन्हा बुजविणे हेच सत्र किती वर्ष चालणार, रस्ता रुंदीकरण होणार की खासगी कंत्राटदाराचे दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राट काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डे दिसत नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी ते भंडारा नाकापर्यंत मोठाले खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना वाहन चालविणे त्रासदायक झाले आहे. गत तीन दिवसापासून पाऊस पडल्याने ठिकठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. खड्डे बुजविणे आवश्यक झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी ठाणा, खरबी येथील मदनपाल गोस्वामी, लोकेश चव्हाण, बादल मेहर, विशु पिंपळशेंडे, निखिल तिजारे, बाळू पडोळे यांनी एका निवेदनातून केली आहे.संततधार पावसाचा परिणामगत तीन दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने नदीनाले ओसंडून वाहत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक ठिकाणी असलेली बंदी उठविल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील चुरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साचल्याने दुचाकीधारकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. त्यातच वाढलेल्या खड्यांमुळे अपघाताची भीती वाढली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग