मोटारसायकल चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST2021-06-11T04:24:33+5:302021-06-11T04:24:33+5:30

मोटारसायकल चोरीच्या आरोपावरून दोघांना गजाआड केल्याने चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरततोंडी येथील लीलानंद तरोणे ...

Motorcycle thief Gajaad | मोटारसायकल चोरटे गजाआड

मोटारसायकल चोरटे गजाआड

मोटारसायकल चोरीच्या आरोपावरून दोघांना गजाआड केल्याने चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरततोंडी येथील लीलानंद तरोणे अर्जुनी - मोरगावच्या बरडटोली परिसरातील कावळे यांच्या घरी टाईल्स लावण्याचे काम करीत होते. सीडी डॉन, एमएच ३५ एक्स २६९० या क्रमांकाची मोटारसायकल शनिवारी घरासमोर ठेवली होती. सायंकाळी अज्ञात इसमाने ती चोरून नेल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेतला असता मोटारसायकलचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी लीलानंद तरोणे यांनी पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणी कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपास हाती घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत मडावी, पोलीस नायक रोशन गोंडाणे, पोलीस शिपाई मोहन कुहीकर यांनी तपासाची गती वाढविली.

Web Title: Motorcycle thief Gajaad