शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात आई हिरावली, तीन चिमुकल्या अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:01 IST

पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठी धावून जात होत्या. अशा सुस्वभावी रेखावर काळाचा घाला आला आणि एका अपघाताने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले.

ठळक मुद्देसाखळी येथील अपघात : सात वर्षापूर्वी सर्पदंशाने वडिलांचा झाला होता मृत्यू, चिचोलीवर शोककळा

तुलसीदास रावते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : पतीच्या मृत्युनंतर संसाराचा गाडा ओढत तीन चिमुकल्या मुलींचे भविष्य ती घडवित होती. आशा सेविका म्हणून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होती. मात्र गुरूवारी ट्रक काळ होवून आला आणि बेसावध क्षणी तीन चिमुकल्यांच्या मातेला हिरावून नेले. आता या तीन चिमुकल्या बहिणी अनाथ झाल्या आहेत. तुमसर तालुक्यातील साखळी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे रात्री उपचारादरम्यान निधन झाल्याने चिचोली गावावर शोककळा पसरली आहे.
रेखा दिनेश पारधी (३३) रा. चिंचोली असे मृत महिलेचे नाव आहे. गुरूवारी आपले कर्तव्य बजावून ती दुचाकीने गावाकडे येत होती. त्यावेळी एका ट्रकखाली दुचाकी चिरडली गेली. त्यात खुशबू उर्फ करिश्मा पारधी (२३) ही जागीच ठार झाली. तर रेखा आणि विद्वेश्वरी ठाकूर या गंभीर जखमी झाल्या. रेखा पारधी यांना उपचारासाठी भंडारा येथे दाखल करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
रेखाचे पती दिनेश यांचा सर्पदंशाने १८ ऑक्टोबर २०१३ रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर आभाळ कोसळले. जान्हवी, लावण्या आणि किर्ती या तीन मुलीचे भविष्य त्यांच्यापुढे उभे होते. अशातच घरच्या मंडळीचा सहकाऱ्याने त्यांनी आशा सेविका म्हणून सेवा सुरू केली. अगदी तुटपुंज्या पगारात त्या नोकरी करीत होत्या. घरी आजारी असलेल्या सासूची सुश्रृशा त्यांना करावी लागत होती.
पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठी धावून जात होत्या. अशा सुस्वभावी रेखावर काळाचा घाला आला आणि एका अपघाताने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले.
रेखा या तुमसर येथे एका रुग्णाच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना दुचाकीचा अपघात झाला. आता जान्हवी, लावण्या आणि किर्ती या तिनही मुली अनाथ झाल्या.
सतत आजारी असणाºया आजीवर त्यांचा भार आला आहे. अशा परिस्थितीत या तीन चिमुकल्या मुलींसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, ही अपेक्षा आहे.

शासनाकडून मदतीची परिवाराला अपेक्षा
आशा सेविका रेखा पारधी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या तुमसर येथे एका रुग्णाला मदत करण्यासाठी गेल्या होत्या. कर्तव्यावरून परत येत असताना हा अपघात झाला. तीन चिमुकल्या अनाथ झाल्या. आता शासनाने या कुटुंबासाठी मदत द्यावी, अशी अपेक्षा तुमसर तालुक्यातील चिंचोली येथील नागरिक करीत आहे. या अपघाताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या चिमुकल्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू