पवनीत अवयवदान समितीची सभा

By Admin | Updated: September 4, 2016 00:35 IST2016-09-04T00:35:22+5:302016-09-04T00:35:22+5:30

शासन निर्णयानुसार अवयव जागृती अभियानाचे आयोजन करून अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी ...

Meeting of the Pawan Organisation Committee | पवनीत अवयवदान समितीची सभा

पवनीत अवयवदान समितीची सभा

पवनी : शासन निर्णयानुसार अवयव जागृती अभियानाचे आयोजन करून अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेली होती.
भेच्या अध्यक्षस्थानी भंडारा विधान सभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एम. नंदागवळी, सहायक गट विकास अधिकारी बी.वाय. मिमस्कार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर लेपसे, डॉ. विकास बावनकर पत्रकार प्रतिनिधी अशोक पारधी, नगरपालिका प्रतिनिधी तिमांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अवयवदानाची चळवळ गावातील लोकांपर्यंत पोहचेल असे मत आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व आमदार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Meeting of the Pawan Organisation Committee