शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या आशीर्वादात घरीच ध्यानसाधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात.

ठळक मुद्देपर्युषण पर्वाला प्रारंभ : जैन धर्मीयांतर्फे विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रोध, मान, माया, लोभ यापासून स्वत:ला परावृत्त करीत क्षमागुण अंगिकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व होय. या पर्वाला जैन धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. गत तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहात जिल्ह्यातील जैन धर्मीय विविध धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करीत आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळामुळे संतांचे आशीर्वाद प्राप्त करीत घरीच ध्यान, साधना व प्रार्थना पूर्ण करीत आहेत.
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात. यासाठी जैन मुनींचे व संतांनी दिलेल्या वचनांचे पालन केले जाते. पर्युषण पर्वात उपवास, नवकारसी, पतीकमन, प्रार्थना याला विशेष महत्व आहे. जिल्ह्यात श्वेतांबर पंथीय असलेल्या कुटुंबियांची संख्या ४० च्या जवळपास आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यात पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.

भंडारात दोन संताचे आगमन
भंडारा शहरात पर्युषण पर्वानिमित्त दोन संतांचे आगमन झाले आहे. यात संत अक्षय मुनी व दिनेश मुनी यांच्या समावेश आहे. या सप्ताहात त्यांनी दिलेल्या उपदेशांचेही पालन जैन धर्मीय करीत आहेत. यात सायंकाळी ६ वाजतानंतर कुणीही जेवण करीत नाही. सकाळ सत्रात पूजा, मांगलीक पाठ, ध्यान, साधना केली जात आहे. याशिवाय सायंकाळी ६.३० ते ७.३० या कालावधीत ध्यान केले जाते. यात मौन धारण करून भगवान महावीरांचे स्मरण केले जाते. आठ दिवसात ज्यांना जसे शक्य होईल ती व्यक्ती निरंकार उपवास करीत असते. सध्या या संतांचे रामदासी मठात वास्तव्य असून पर्युषण पर्वाच्या समाप्तीनिमित्त ते अनुयायांना विशेष मार्गदर्शनही करणार आहे.

पर्युषण पर्व हे जैन धर्मियांसाठी अलौकीक पर्वणी आहे. यात प्रत्येक समाज बांधव भगवान महावीरांनी दिलेल्या उपदेशांचे पालन करून जीवनयापन करण्याचा प्रयत्न करीत असतो. २२ आॅगस्ट रोजी या पर्वाची समाप्ती होणार आहे.
- रमेशकुमार जैन, भंडारा.

टॅग्स :Socialसामाजिक