वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त़, आरोग्य व्यवस्था विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:47+5:302021-04-05T04:31:47+5:30

भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सध्या कोंढा परिसरात कोरोनाचा दररोज प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या ...

Medical officer's post vacant, health system disrupted | वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त़, आरोग्य व्यवस्था विस्कळीत

वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त़, आरोग्य व्यवस्था विस्कळीत

भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सध्या कोंढा परिसरात कोरोनाचा दररोज प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या येथे कोरोना लसीकरण जोरात सुरू आहे. यासाठी येथील आरोग्य कर्मचारी दिवसभर सेवा देत आहेत, तसेच दिवसरात्र रुग्णावर उपचार करीत आहे, पण येथे वैद्यकीय अधिकारी पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे.

येथे असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. कडीखाये यांना तात्पुरती व्यवस्था म्हणून भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले, पण तेथून त्यांना परत बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे एक महिन्यापासून येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामकाज सुरू आहे. बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण यांच्यावर उपचार करावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. ५० पेक्षा जास्त गावांची आरोग्य सेवा त्यांच्या खांद्यावर आहे. तेव्हा कोंढा आरोग्य केंद्रात तत्काळ वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

Web Title: Medical officer's post vacant, health system disrupted