पवनारातील मुख्य रस्ते नागरिकांनी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:46+5:30

कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउंड बॉक्स पकडून गावकऱ्यांना दिला. गावातील मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांच्या मदतीने लाकडे ठेऊन बंद करण्यात आले.

The main roads in Pawanara were closed by citizens | पवनारातील मुख्य रस्ते नागरिकांनी केले बंद

पवनारातील मुख्य रस्ते नागरिकांनी केले बंद

Next
ठळक मुद्देकोरोना : प्रत्येक घरी केली जात आहे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील पवनारा येथील सरपंच रशीद शेख यांनी सकाळच्या सुमारास प्रत्येक घरी जाऊन कोरोना या आजाराविषयी जनजागृती करून प्रत्येक नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर लाकडाचे ओंडके ठेवून वाहतूक बंद केली आहे.
कोणीही लहान मोठी मंडळी घराबाहेर जाऊ नका व बाहेर गावावरून कुणालाही येऊ देऊ नका २१ दिवस लॉकडाउन आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, वेळोवेळी साबनानी हात स्वछ धुवा, कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघााड आल्यास तुरंत कळवा, असा सामाजिक संदेश हातात माईक व सायकलवर साउंड बॉक्स पकडून गावकऱ्यांना दिला. गावातील मुख्य रस्त्यावर गावकऱ्यांच्या मदतीने लाकडे ठेऊन बंद करण्यात आले.
आजही ग्रामीण कोरोना आमच्या गावात येत नाही, अशाप्रकारे चर्चा करतात त्यांची समजूत काढण्याकरिता गावातीलच शिक्षित नागरिकांना पुढे येऊन त्यांची समजूत काढणे आवश्यक आहे.

Web Title: The main roads in Pawanara were closed by citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.