शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; साकोलीत भाजप आणि वंचितमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे चित्र एकदम बदलल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अडचणीत : बदलत्या समीकरणाची सर्वत्र चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरूवातीला तिरंगी लढतीचे चित्र असलेल्या साकोली मतदारसंघात आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यापुढे वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांना मिळणारी ‘निष्ठावंतां’ची सहानुभूती काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरत आहे. साकोलीतील या बदलत्या समीकरणाची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात चर्चा होत आहे.
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे चित्र एकदम बदलल्याचे दिसत आहे. होम ग्राऊंडवर काँग्रेस उमेदवार नाना पटोले आता अडचणीत आल्याचे चित्र आहे. उमदेवारी दाखल करायाची आणि साकोली कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोडून राज्यात प्रचाराला निघायचे असे नियोजन नाना पटोले यांचे होते. मात्र मतदारसंघातील ढासळता बुरूज पाहून त्यांचा पाय साकोली मतदारसंघाबाहेर निघत नाही. राज्यात सोडा भंडारा जिल्ह्यातही इतर मतदारसंघात त्यांची सभा झाली नाही. यावरून त्यांच्यापुढे किती मोठे आव्हान भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने उभे केले याचा अंदाज येतो.
वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांनी गावागावांत आपली पकड निर्माण केली आहे. थेट काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देत आपली भूमिका सांगत आहेत. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसादच या निवडणुकीचे चित्र बदलविणारे आहे.
भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी सुरवातीपासूनच मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. गावागावांत त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजपसाठी संजीवनी ठरत आहे. सुरवातीला तिरंगी असलेल्या साकोलीची लढत आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होत आहे.

दुटप्पी धोरणाचा काँग्रेसला फटका
कॉग्रेस उमेदवार नाना पटोले काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख आहेत. राज्यभर प्रचारासाठी जावे लागणार असल्याने आपण विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी सुरवतीला भूमिका घेतली होती. त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्जही केला नाही. तसेच मुलाखतही दिली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीटासाठी अनेकजण उत्सुक होते. त्यांनी निवडणुकीपुर्वी मतदारसंघात बांधणी करण्यास सुरूवात केली होती. त्यात मोठा खर्च झाला. मात्र वेळेवर नाना पटोले यांनी रिंगणात उडी घेतली. त्यांच्या या दुटप्पी धोरणाचा फटका या निवडणुकीत बसत असून माजी आमदार सेवक वाघाये यांनी त्यात उघड भूमिका घेतली.

टॅग्स :sakoli-acसाकोली