शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनावर ‘लंपी स्कीन डिसिज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

ठळक मुद्देविषाणूजन्य साथीचा आजार : पशू व गोठ्यांची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात पशूधनावर ‘लंपी स्कीन डिसीज’ विषाणूजन्य साथीच्या आजाराचा प्रवेश झाला आहे. सदर आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नाही. लहान वासरांमध्ये याची अधिक तीव्रता दिसून येते.
लंपि स्किन डिसीज हा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. या आजाराचा प्रसार एका बाधीत पशूधनापासून दुसऱ्या पशूधनाला डास, चावणाऱ्या माशा व गोचीड यांच्यामार्फत होतो. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. याआजाराने बाधीत झालेल्या जनावरांना डोके, मान, पोट, पाठ, पाय तसेच शेपटी खाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात व काही दिवसांनी त्यामधून पस येऊ शकतो. नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरतुकीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. बाधित होणारे पशुधन आजार प्रामुख्याने सर्व वयोगटातील संकरीत व देशी गाय वर्ग, म्हैस वर्गातील पशुधनास होऊ शकतो. लहान वासरांमध्ये याची तीव्रता अधिक नसते. पशुधनास बाधा होण्याचे प्रमाण दहा ते वीस टक्के असून लागण झालेल्या जनावरांना मृत्यू होण्याचे प्रमाण एक ते पाच टक्के एवढे आहे.
अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास बाधित पशूधन तात्काळ इतर पशूधनापासून अलग करणे आवश्यक आहे. साथ भागातील पशूधनाची वाहतूक व विक्री थांबवणे आवश्यक आहे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी रोगाचा प्रसार करणारे कीटाणू जसे डास, माशा व गोचीड यांचे निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. बाधित पशूधन व सामान्य पशूधन चराईसाठी एकत्र सोडू नये. हा आजार कीटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा लागेल. तसेच गोठ्याशेजारी पाणी, शेण, मुत्र जमा होवून चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात असलेले कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करावा. सद्यस्थितीत यावर प्रतिबंधात्मक लस किंवा औषधोपचार उपलब्ध नाही. तथापि आजारी पशुधनाच्या लक्षणानुसार उपचार केल्यास दोन ते तीन आठवड्यामध्ये पशूधन पूर्णपणे बरे होऊ शकते. सदरचा आजार पशूधनापासून मानवास होत नाही. हा आजार शेळ्यामेंढ्या व मानवास होत नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
प्रतिबंधक उपाय योजनेकरिता घरच्या घरी कीटकनाशक बनविण्यासाठी एक लीटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली निम तेल आणि १० ग्राम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी. हे द्रावण ०,३ व ७ व्या दिवशी पशुधनावर फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये सर्व प्रकारच्या कीटकांचे निर्मूलन होते व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होऊ शकते.

टॅग्स :Socialसामाजिक