Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ रुपयांच्या जवळ पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:41 IST

Rupee at All-time Low: भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सध्या रुपयाच्या घसरणीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. गुरुवारी, १४ मे रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपयानं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली.

Rupee at All-time Low: भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सध्या रुपयाच्या घसरणीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. गुरुवारी, १४ मे रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपयानं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि मध्य पूर्वेतील वाढता तणाव यामुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

रुपयाने गाठला नीचांकी स्तर

फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये गुरुवारी रुपयाची सुरुवातच कमकुवत झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला रुपया २० पैशांनी घसरून प्रति डॉलर ९५.८६ या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला. बुधवारी देखील रुपया ९५.८० च्या निचांकी स्तरापर्यंत घसरला होता आणि ९५.६६ वर बंद झाला होता. विशेष म्हणजे, या आठवड्यातच रुपया सुमारे १.४ टक्क्यांनी कमकुवत झाला असून मंगळवारपासून दररोज रुपया घसरणीचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.

सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट

रुपया कमकुवत होण्याची प्रमुख कारणं:

तज्ज्ञांच्या मते, खालील कारणांमुळे रुपयावर दबाव वाढत आहे:

कच्च्या तेलाचा भडका: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर स्थिर आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री: परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात सातत्यानं शेअर्सची विक्री सुरू आहे.
डॉलरची मजबूती: जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स वधारल्याचा परिणाम रुपयावर होत आहे.
इराण युद्ध आणि तणाव: मध्य पूर्वेतील संघर्ष आणि इराण युद्धाबाबतच्या वाढत्या चिंतेमुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे.

काय होईल परिणाम?

भारत आपल्या गरजेच्या ९०% तेल आणि ५०% गॅससाठी आयातीवर अवलंबून आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात अधिक महाग होणार आहे. जर इराणमधील युद्ध दीर्घकाळ चाललं, तर याचा सर्वात मोठा फटका रुपयाच्या मूल्याला आणि देशांतर्गत महागाईला बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या आयात खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरही बोजा पडण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee hits record low, nearing 96 against the dollar.

Web Summary : The Indian Rupee plummeted to a record low against the US dollar due to rising crude oil prices, foreign investor selling, and Middle East tensions. Experts fear higher import costs and inflation if the situation worsens, impacting consumers.
टॅग्स :पैसाअर्थव्यवस्थाअमेरिका-इस्रायल-इराण वॉर