Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: May 14, 2026 11:48 IST

Cannes Film Festival : मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगही 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झळकला. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चे फोटो पुष्करने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची जगभरात चर्चा आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावर्षीही आलिया भट, उर्वशी रौतेला, तारा सुतारीया या अभिनेत्रींनी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. त्याबरोबरच मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगही 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये झळकला. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चे फोटो पुष्करने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'साठी पुष्करने खास लूक केला होता. काळ्या रंगाचा सूट, गॉगल असा डॅशिंग लूक करत पुष्कर जोग 'कान्स फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर उतरला. "७९व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरचा अनुभव खरोखरच भारावून टाकणारा होता. आंतरराष्ट्रीय मीडिया, फ्रेंच पापाराझी, हॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक आपल्या शेजारून चालताना पाहणं म्हणजे अविस्मरणीय क्षण होता. कान्स फेस्टिव्हलमध्ये माझ्या देशाचं भारताचं आणि माझ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणं ही खूप खास आणि अभिमानाची भावना होती. जय महाराष्ट्र", असं पुष्करने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल

पुढे त्याने आभारही मानले आहेत. "मनापासून कृतज्ञ आहे. धन्यवाद देवा, धन्यवाद आई आणि बाबा…लव्ह यू फेलिशा, डॅडा फ्रान्स टीव्हीवर कान्स फेस्टिव्हलमध्ये लाईव्ह दिसला", असं त्याने म्हटलं आहे. पुष्कर जोग हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 'जबरदस्त' या सिनेमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. मराठी सिनेमाला ऑस्करवारी करण्याचं पुष्करचं स्वप्न आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actor Pushkar Jog shines at Cannes 2026 red carpet.

Web Summary : Pushkar Jog, a Marathi actor, attended the Cannes Film Festival 2026. He shared photos on social media, expressing pride in representing India and Maharashtra. He looked dashing in a black suit and sunglasses on the red carpet, calling the experience unforgettable and expressing gratitude.
टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलपुष्कर जोग