जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा निच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:20+5:302021-02-05T08:40:20+5:30

भंडारा : जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून, गत दोन महिन्यांत सर्वात कमी रुग्णांची नोंद बुधवारी करण्यात आली. जिल्ह्यात केवळ १५ ...

The lowest number of corona patients in the district | जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा निच्चांक

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा निच्चांक

भंडारा : जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून, गत दोन महिन्यांत सर्वात कमी रुग्णांची नोंद बुधवारी करण्यात आली. जिल्ह्यात केवळ १५ रुग्ण आढळून आले असून, चार तालुक्यांत तर एकही रुग्ण आढळून आला नाही.

बुधवारी जिल्ह्यातील २४८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात भंडारा तालुका ६, मोहाडी १ आणि तुमसर तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले. पवनी, लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यांत बुधवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. बुधवारी १४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ७९७ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३ हजार १५९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यातील १२ हजार ६६० व्यक्तींनी कोरोनावर मात केली.

सध्या १७९ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सध्या जिल्ह्यात कोरोनामुळे ३३० व्यक्तींचा बळी गेला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या घटत आहे. बुधवारी तर आतापर्यंतच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

Web Title: The lowest number of corona patients in the district