शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची लोहार समाज मंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

शेतातील घर पेटवून दिल्याची खोटी तक्रार दाखल केली. या खोट्या प्रकरणात अंकुश लोहार व त्यांच्या पत्नीला कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. औदूंबर दत्तू शेळके याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याटेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : लोहार समाजाच्या लोकांना जबर मारहाण करून खोटे गुन्हे लावणाºया लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा लोहार समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पवनी येथील तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील अंकुश दगडू लोहार व त्यांची पत्नी वैशाली लोहार रा.बेंबळे ता.माढा यांच्यावर गावातील औदूंबर दत्तू शेळके यांनी जुन्या वैमनस्यातून भादंवि कलम ४३५, ४३६ अन्वये गुन्ह्यात अडविले. तसेच जबर मारहाण केली. टेंभूर्णी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दबाव आणून त्यांना हाताशी धरून ऊसाचे शेत पेटवून दिले.
तसेच शेतातील घर पेटवून दिल्याची खोटी तक्रार दाखल केली. या खोट्या प्रकरणात अंकुश लोहार व त्यांच्या पत्नीला कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. औदूंबर दत्तू शेळके याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याटेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. एक महिन्यात सदर प्रकरणाची चौकशी न केल्यास लोहार समाज मंडळातर्फे आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार निलीमा रंगारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात भंडारा जिल्हा लोहार समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.चरणदास बावणे व पदाधिकारी सुनील सूर्यवंशी, मुन्ना मेश्राम, गंगाधर बावणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक