शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन अनेक घरकुला लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करत आहे. तुमसर शहरात सन २०१८ मध्ये सुमारे २५० ते ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दोन लक्ष ५० हजारांचा निधी घरकुलासाठी देण्यात येतो.

ठळक मुद्देशहरात घरकूलचे ३०० लाभार्थी : केंद्राचा निधी मिळालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :
तुमसर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. घरकुलाचा निधी न मिळाल्याने तुमसर तालुक्यातील अनेक घरकुलाची बांधकामे रखडली आहेत. घरकुल लाभार्थ्यांना किरायाचे पैसे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुमसर शहरातील घरकुल लाभार्थी शासनाकडे न्यायाची मागणी करीत आहे.
सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन अनेक घरकुला लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करत आहे. तुमसर शहरात सन २०१८ मध्ये सुमारे २५० ते ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दोन लक्ष ५० हजारांचा निधी घरकुलासाठी देण्यात येतो.
आतापर्यंत राज्य शासनाने एक लाखाचा निधी घरकुल लाभार्थ्यांना दिला आहे.
उर्वरित दीड लाखाचा निधी केंद्र शासनाने अद्यापही दिलेला नाही. एक लाख रूपयाचा निधी लाभार्थ्यांनी घराच्या भिंती उभ्या केल्या आहेत. काहींनी जवळील पैसे खर्च करून घराचा स्लॅब उभारला आहे. तर अनेकांची घरकुल बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे. अनेकांनी घराचे बांधकाम सुरू केल्याने किरायाचा घराचा आसरा घेतला आहे. त्यामुळे घरमालकांना भाडे देण्यासाठी देखील लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याने अनेक समस्या सतावत आहेत.
कोरोना संकटात जीवनावश्यक गोष्टींचा सामना करत असतानाच घरकुल लाभार्थ्यांना निधी अभावी मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे घरमालकांचे भाडे द्यायचे कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा आहे.
शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांना एक लाखाचाच निधी देण्यात आला. उर्वरित दीड लाख रूपये अजून मिळालेले नाही. घरकुल लाभार्थ्यांना शासनाने किमान भाड्याचे पैसे देण्याची गरज आहे.
-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या