लाईनमनची मनमानी, कृषिपंप चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:50+5:30

तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले.

Lineman's arbitrary, agrarian pump driver suffers | लाईनमनची मनमानी, कृषिपंप चालक त्रस्त

लाईनमनची मनमानी, कृषिपंप चालक त्रस्त

Next
ठळक मुद्देविहीरगाव येथील प्रकार : आठ दिवसांपासून रोहित्रामध्ये बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : धानाचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या लाखांदूर तालुक्यात सद्या स्थितीत उन्हाळी धान रोवणीची कामे वेगाने होत आहेत. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रोवणीसाठी पाणी मिळवताना येथील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, विहीरगाव गावातील कृषिपंपाच्या विद्युत रोहित्रामध्ये गत दहा दिवसांपासून बिघाड आला आहे. माञ लाईनमन व महावितरणच्या कर्मचाºयांच्या मनमानीमुळे कृषीपंप चालक त्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील विहीरगाव येथे गेल्या दहा दिवसापासून ट्रान्सफार्मर मधील फ्यूज उडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार लाईनमन यांच्या लक्षात आणुन देण्यात आला होता. माञ त्यांनी याकडे टाळाटाळ करत, रोहित्रामध्ये अतिरिक्त जोडणी असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले. विनापरवाना चालत असलेले कृषीपंपाची जोडणी काढल्यानंतरही रोहित्रामधील फ्यूज उडण्याचा प्रकार थांबला नाही. या ट्रान्सफार्मवर ३२ शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे जोडणी असून, सर्व शेतकऱ्यांच्या रोवणीची कामे चालू आहेत. यापैकी कोणत्याच शेतकºयांचे रोवणी पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पिडीत शेतकऱ्यांनी ही बाब विरली/बुजचे कार्यकारी अभियंते एस.के.खोब्रागडे यांना सांगितली होती. . दहा दिवसाचा कालावधी लोटूनही रोहित्र दुरुस्ती करण्यात आले नाही. सोमवारी शेतकऱ्यांनी लाखांदुर येथील कार्यकारी अभियंता गडपायले यांची भेट घेऊन समस्या कथन केली. सदर लाईनमन यांची तात्काळ बदली करण्याची मागणी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोहर ढोरे, तं.मु.स.अध्यक्ष संतोष ढोरे, ताराचंद राऊत, टायटस ढोरे, संतोष राऊत, चुन्निलाल ढोरे, निखील बगमारे, रतन ढोरे, अनिल धोटे, प्रकाश भागडकर, कवळू देशमुख या शेतकºयांनी केली आहे.

विहीरगाव येथे विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याचे आपल्याला माहिती नव्हते. दहा दिवसानंतर गावकरी माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे आपण दोन दिवस तरी काहीच करू शकत नाही.
- नंदलाल गडपायले,
कार्यकारी अभियंता, लाखांदूर

Web Title: Lineman's arbitrary, agrarian pump driver suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज