शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लहान पुलावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही.

ठळक मुद्देवैनगंगा दुथडी। जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या लहानपुलावरून वाहतुकीस तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यानंतरही खुलेआम वाहतूक सुरु आहे. सध्या वैनगंगा दुथडी भरून असून या लहान पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत. याप्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून प्रशासनाने फलक लावून आपले केवळ कर्तव्य पार पाडले आहे.भंडारा शहराजवळून विशाल पात्र असलेली वैनगंगा वाहते. मोठा पुल होण्यापूर्वी लहानपुलावरून वाहतूक होत होती. ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा दगडी पुल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर बॅकवॉटर या पुलापर्यंत राहते. त्यामुळे वैनगंगा येथे कायम दुथडी भरून असते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पुल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. पुरुषांसोबत महिलाही या पुलावरून आपली वाहने घेऊन जात असल्याचे दृष्य नेहमीच दिसते.यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरु आहे.हा पुल वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जुना पुल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कुणीही जबरीने पुलावरुन प्रवास केल्याने अनुचित घडना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असे म्हटले आहे. याबाबतचे दोन फलक वैनगंगा नदीवरील लहान पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहे. प्रत्येक वाहनधारक या फलकाकडे पाहतो आणि सुसाट वाहन पळवित असल्याचे चित्र आहे.सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना नाहीत. एखादा अपघात घडल्यास मदतीलाही कुणी येण्याची शक्यता नाही. प्रशासनाने मात्र आपले कर्तव्य बजावले, परंतु नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसते.सुसाईड पॉइंटवैनगां नदीचे दोन्ही पुल सुसाईड पॉइंट म्हणून ओळखले जातात. गत वर्षभरात अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दीड वर्षापूर्वी एका प्रेमी युगुलाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सातत्याने या पुलावरून आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. रात्रीबेरात्री या पुलावर कुणीही नसल्याची संधी साधून आत्महत्या केली जाते. त्यानंतर मृतदेह शोधताना मोठी कसरत करावी लागते.पूल कायमचा बंद करावैनगंगा नदीवरील लहान पुलावर लोखंडी कठडे आडवे लावण्यात आले आहेत. परंतु दुचाकी वाहने हे कठडे पार करून पुलावरून प्रवास करतात. बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजू कायमच्या बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :riverनदी