शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:28 PM

कोका येथील घटना, शवविच्छेनानंतर गुपीत उघड, भंडारा वनवृतात खळबळ

ठळक मुद्देरविवारी सकाळी कोका गावाजवळील बोडीत पाळीशेजारी एक नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांची गर्दी बोडीच्या दिशेने जात असल्याचे वनाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

करडीपालोरा (भंडारा) : कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कोका गावाबाहेरील बोडीत रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका सहा वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्यानंतर शेतशिवारातून बोडीत आणून फेकल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

रविवारी सकाळी कोका गावाजवळील बोडीत पाळीशेजारी एक नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांची गर्दी बोडीच्या दिशेने जात असल्याचे वनाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. वरिष्ठांना इत्यंभूत माहिती देताच वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. साकोली वन्यजीव कार्यालयातून डॉग स्कॉट पाचारण करण्यात आले. बोडी शेजारील शेतशिवारात शोधमोहीम राबविण्यात आली. बिबट्याच्या मृतदेहाला कोका येथील वनविश्रामगृहात हलविण्यात आले. लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके व मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर परिसरातच दाह संस्कार करण्यात आले.

दरम्यान, यावेळी भंडाराचे वनसंरक्षक एस. बी. भलावी, सहाय्यक उपवनसंरक्षक एस.एन. शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नागदेवे, वनरक्षक तिरपूडे, कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी आर. पी. धनविज व वनकर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

'मृत बिबट्या हा नर जातीचा असून ५ ते ६ वर्षांचा आहे. कोका गावाशेजारील बोडी लगत शेतशिवार असून विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. शिकारीच्या शोधात बिबट असतांना सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान छाती व अन्य भागास विजेचा धक्का लागल्याने तो जागीच ठार झाला.-डॉ. गणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी मानेगाव. 

टॅग्स :leopardबिबट्याbhandara-acभंडाराelectricityवीज