आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:44+5:30

काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.

The left of the government to end the reservation | आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएस प्रणित शासनाचा डाव आहे. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण सपवण्याचा प्रयत्नात असून काँग्रेस पक्ष हा कुटील डाव हाणून पाडेल. या विरोधात काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकारविरूद्ध भाजप हटाव आरक्षण बचाव या अंतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मधूकर लिचडे, प्रकाश पचारे, सुरेश मेश्राम, रविभूषण भुसारी, महेंद्र निंबार्ते, मुकूंद साखरकर, अमरनाथ रगडे, रेखा वासनिक, प्रेम वनवे, होमराज कापगते, उत्तम भागडकर, मंगेश हुमणे आदी उपस्थित होते.
सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या देण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण विरोधी मुद्यावर भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. काँगे्रस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.

लाखनीतही निषेध
लाखनी : येथील महिला काँग्रेस कमिटीतर्फे मीनाक्षी बोपचे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रजनी मुळे, मुरमाडीच्या सरपंच सुनिता भालेराव, माधवी बावनकुळे, सविता गौरे, शांता भोसकर, प्रिया खंडारे, जिजा तुमडाम, मोनाली गाढवे, रूपलता जांभुळकर, रजनी आत्राम, कल्पना भिवगडे, मुनेश्वरी पटले, संध्या धांडे आदी उपस्थित होते.

प्रति सिलिंडरमागे दरवाढ
तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत १४४ रूपये प्रती सिलिंडर वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर ९१४ रूपयात प्रती सिलिंडर मिळत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही भाव वाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: The left of the government to end the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.